• Sun. Jun 7th, 2026
    Sansad Ratna 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यातील 5 खासदारांचं नाव देशाच्या संसदेत गाजणार, ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

    नवी दिल्ली : आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला `संसद रत्न’ मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज भाषणांनी विरोधकांची झोप उडविणारे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा ‘संसद रत्न ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे.

    संसद रत्न पुरस्कारांचा १६ वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असून, यावेळी १५० वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट फॉऊंडेशनचे श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली. “संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी परीक्षक समितीने १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. यावर्षी आम्ही १५० वा पुरस्कार प्रदान करणार आहोत,” अशी माहिती संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी दिली.

    “वैयक्तिक श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशचे जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे,” असेही त्यांनी सांगितले. “याशिवाय उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे बिद्युत बरन महातो, राजस्थानचे लुम्बाराम चौधरी, महाराष्ट्राचे नरेश गणपत म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, स्मिता उदय वाघ, डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी आणि गुजरातचे नरहरी अमीन यांचीही निवड करण्यात आली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

    “संसदेत बजेट अधिवेशन २०२६ अखेरपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे विविध श्रेणींमध्ये त्यांना गौरविण्यात येणार आहे,” असे प्रियांदर्शनी राहुल यांनी नमूद केले.

    उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार संसदीय समित्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चेन्नईस्थित प्राईम पॉईंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने २०१० मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली होती. पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांनी केले होते. “प्राइम पॉईंट फाउंडेशनने नुकताच आपला २५ वा वर्धापन दिन साजरा केला आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच संसद रत्न पुरस्कारांचे संस्थापक श्रीनिवासन यांनी दिली.

    “ज्येष्ठ पुरस्कारप्राप्त संसद सदस्य, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मान्यवर परीक्षक समितीद्वारे विजेत्यांची निवड केली जाते. खासदार आणि समित्यांच्या संसदीय कामगिरीच्या आकडेवारीच्या आधारे निवड केली जाते. ही माहिती पी आर एस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांकडून उपलब्ध करून दिली जाते,” असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.

    नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया

    “शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला जाहिर झाला आहे. मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत आहे”, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे खसदारह नरेश म्हस्के यांनी दिली.

    या पुरस्कारासाठी निवड करताना संसदेतील अधिकृत आकडेवारी, पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील माहितीचा आधार घेतला जातो. ज्युरीमध्ये माजी संसदीय अधिकारी, घटनातज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. त्यामुळे संसद रत्न पुरस्कार हा संसदीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि विश्वासार्ह सन्मान मानला जातो.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed