• Sun. Jun 14th, 2026

    कोंडीमुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच उड्डाणपूल खुला; 24 तासांत दोन अपघात, पुण्यात रक्षक चौकातील पुलाची चर्चा

    कोंडीमुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच उड्डाणपूल खुला; 24 तासांत दोन अपघात, पुण्यात रक्षक चौकातील पुलाची चर्चा

    Rakshak Chowk Flyover: प्रवाशांच्या वाढत्या वागणीमुळे रक्षक चौकातील उड्डाणपूल किरकोळ कामं शिल्लक असतानाच खुला करण्यात आला असून 24 तासांत एका कार उलटली तर एका दुचाकी आणि चारचाकीची धडक झाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पिंपळे निलख: औंध-रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रक्षक चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनापूर्वीच नागरिकांसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, किरकोळ कामांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

    औंध ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यावसायिक आणि स्थानिक वाहनचालकांकडून उड्डाणपूल तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने उद्घाटनाची औपचारिक तारीख निश्चित होण्याची प्रतीक्षा न करता शुक्रवारी रात्रीच उड्डाणपूल खुला केला.

    Maharashtra TimesPune-Satara Highway: पुणे-सातारा प्रवास फक्त 1 तासात; महामार्गावर बहुमजली उड्डाणपुलांची योजना, शिरवळ, खंबाटकी घाटातील कोंडी फुटणार

    चेंबर्सची दुरुस्ती रखडली

    याचबरोबर सांडपाणी व्यवस्थेचाही गंभीर प्रश्न समोर आला आहे. उड्डाणपूल उभारणीदरम्यान अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी चेंबर्स तुटली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुरूम व माती गेल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची काही चेंबर्स रस्त्याखाली गेल्याने सांडपाण्याला अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व चेंबर्सची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याची मागणी नागिरक करीत आहेत.

    ‘पदपथ पूर्ववत करा’

    उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी काही नागरी समस्या अद्याप कायम आहेत. उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मुख्य रस्ता सुरू ठेवण्यासाठी काही ठिकाणी पदपथाचा भाग हटविण्यात आला होता. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसून, पपथ पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

    ‘उड्डाणपुलाच्या तांत्रिक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे दुसऱ्याच दिवशी अपघात झाला आहे. भविष्यात नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. पालिका प्रशासनाने उतारामध्ये दुरुस्ती करावी,’ अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

    Maharashtra TimesPune Metro: महामार्गावरून शहरापर्यंत थेट मेट्रोने प्रवास! पुण्यात लाइन 1 आणि 2चा विस्तार सुरू; कुठे-कशी असतील स्थानकं?

    “रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या खालील बाजूची कामे सध्या चालू असल्याने चौकातील वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे उद्घाटनापूर्वी वरिष्ठांशी चर्चा करून सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपूल वापरास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे,” संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, प्रकल्प स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

    २४ तासांत पुलावर दोन अपघात

    रक्षक चौक येथील उड्डाणपूल शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आला. यानंतर अवघ्या २४ तासांत शनिवारी पुलावर दोन अपघात झाले. यामध्ये उड्डाणपुलाच्या मध्यावर दुपारच्या वेळी चारचाकी उलटली, तर दुसऱ्या अपघातात एक दुचाकी व चारचाकी धडकून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याचे सांगवी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा