Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण घडत आहे. अशातच रत्नागिरीमधील कुवारबाव साईनगर परिसरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मैत्रिणीसमोर मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव साईनगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची कोयत्याने निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 21 मे रोजी उघडकीस आली होती. या हत्या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मैत्रिणीजवळ बोलल्याच्या रागातूनच ही अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात ज्या मैत्रिणीसमोरच हा सगळा प्रकार घडला ती मैत्रीण घटनास्थळावरून फरार झाली आहे, तिचा शोध पोलीस घेत आहेत. सुरज राजाराम झोरे (वय 25, मूळ रा. नायरी-संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
गुरुवारी 21 मे रोजी रात्री उशिरा घडलेल्या या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांमध्येच तिघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली होती. कुवारबाव येथील साईनगर परिसरातील सात बंगल्याच्या मागील भागात रात्री 9.30 ते 11 च्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली. रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज झोरे हा काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. यावेळी संशयितांनी त्याला गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये संशयित सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख ऊर्फ सोनू यांचा समावेश आहे. Ratnagiri Crime: मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का, ३० वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
‘तो तुला सोडून जाईल’
सोहम याच्या मैत्रिणीला सुरजने सल्ला दिला होता की, ‘तो तुला सोडून जाईल’, तोच सल्ला सुरजच्या जीवावर बेतला आहे. सुरजला रस्त्यात गाठून त्याला तिघांनी अडवून अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या केली. मारहाण झाल्यानंतर सुरज हा एका कंपाउंडमध्ये जीव वाचवण्यासाठी पळाला होता. मात्र, त्याठिकाणी पाठलाग करत त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतरच आरोपींनी तिथून पळ काढला होता. अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, ज्या मैत्रिणीला सुरजने सल्ला दिला, ती मैत्रीण घटनास्थळावरून फरार झाली आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत. Pune Crime NEET Paper Leak : पुरावा नष्ट करण्यासाठी अनोखी शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; मनिषा हवालदारने काय केलं?
मृत्यूपूर्वी महत्त्वाचा जबाब दिला
गंभीर अवस्थेत असलेल्या सुरजने आपल्या बहिणीला फोन करून या सगळ्याची माहिती दिली होती. सुरजला घटनास्थळावरून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. सुरजच्या मृत्युपूर्वी घेतलेल्या जबाबात आपल्याला ज्यांनी मारहाण केली त्या सगळ्यांची नाव सुरजने पोलिसांना दिली होती. रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीनही संशयित आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा