• Sun. Jun 14th, 2026

    Anna Hazare: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

    Anna Hazare: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

    अहिल्यानगर: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपरोधिक डिजिटल संघटनेनं धुमाकूळ घातला असून या संघटनेनं सरकारवर केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील आमचे अकाऊंट्स बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

    नवीन पक्षावर भाष्य करताना अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की, “नवीन राजकीय पक्षाचं नाव झुरळ असलं तरी या पक्षाच्या मागे तरुण मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. या पक्षाचं नाव झुरळ हे ठेवण्याचा उद्देश काय होता, हे समजून घेतलं पाहिजे. झुरळ जरी म्हटलं असेल, ते नाव जरी योग्य वाटत नसेल तरी या पार्टीच्या मागे तरुण उभे राहिले हे महत्त्वाचं आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असं समजून शासनाने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे,” असं आवाहन हजारे यांनी सरकारला केलं आहे.

    सरकारकडून कारवाई

    ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या संघटनेवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून, हॅकिंग आणि खाती ब्लॉक केल्यामुळे संघटनेने आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरील नियंत्रण गमावले आहे, असा दावा ‘सीजेपी’चा संस्थापक अभिजीत दीपके याने शनिवारी केला होता. तसेच दीपके याचे वैयक्तिक इंस्टाग्राम खातेही हॅक झाल्याचे त्याने स्पष्ट केले.

    दोन दिवसांपूर्वीच ‘सीजेपी’चे अधिकृत एक्स खाते भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी या संघटनेने नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून मोहीम सुरू केली होती.

    शनिवारी एक्सवर माहिती देताना दीपके म्हणाला, ‘सीजेपी’चे मुख्य इन्स्टाग्राम पेज आणि माझे वैयक्तिक खाते हॅक झाले आहे. मुख्य ट्विटर खाते आधीच ब्लॉक होते आणि आता बॅकअप खातेही काढून टाकण्यात आले आहे. आमचे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे यापुढील पोस्ट अधिकृत मानल्या जाऊ नयेत. ‘सीजेपी’चे संकेतस्थळही आता बंद पडले आहे. पेपर फुटीवर उत्तरदायित्व मागितल्यामुळेच ही कारवाई होत असल्याचा टोला त्याने लगावला. दरम्यान, बंगळुरूमधील मानवी साखळी आंदोलनाशी ‘सीजेपी’चा संबंध नसल्याचे स्पष्ट करून, ‘आम्ही असे कोणतेही आवाहन केलेले नाही. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सरकार केवळ एका चुकीची वाट पाहत आहे, त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी,’असे आवाहन संघटनेने केले आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) या संघटनेच्या बेंगळुरू येथील नियोजित मानवी साखळी आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा निर्णय पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि इतर तांत्रिक बाबी तपासून स्वतः घेतला आहे.

    दरम्यान, आता पुन्हा एकदा इन्स्टाग्राम अकाऊंट रिकव्हर करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अभिजीत दीपके याच्याकडून देण्यात आली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed