• Fri. Jun 5th, 2026

    Pune Rain: ‘मान्सूनपूर्व’च्या दमदार सरी! उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; पिंपरीसह ग्रामीण भागातही पर्जन्यसरी

    Pune Rain: ‘मान्सूनपूर्व’च्या दमदार सरी! उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; पिंपरीसह ग्रामीण भागातही पर्जन्यसरी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या काही दिवसांपासून कमालीच्या उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी दिलासा मिळाला. शहरात दुपारनंतर वातावरण बदलले, आकाशात ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरती सुटका मिळाली आहे.

    शहरात सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण आणि दमटपणा जाणवत होता. दुपारनंतर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख पसरला, सोसाट्याच्या वारा सुटला, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यवर्ती पेठांसह शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. हडपसर, कोंढवा. भोरः तसेच पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मुसळधार सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

    Manisha Hawaldar : पुण्यातील मुख्याध्यापिका ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी जाळ्यात, महिन्यावर आलेली नोकरीला कलाटणी देणारी घटना, त्याआधीच गोत्यात
    पिंपरीतही जोरदार बरसला
    सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, पिंपळे निलख, वाकडसह पिंपरी-चिंचवड, भोसरीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, पावसामुळे झाडपडीच्या १९ घटना घडल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाडे हटविण्याचे काम केले. रहिवासी क्षेत्रात अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

    वीज पडून एक ठार, तीन जखमी
    भोर : तालुक्यात उत्रौली कानव्हडी भागात परीटमाळ येथे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या अंगावर वीज पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. शंकर किसन काटेकर (वय २२, रा. वडगाव डाळ, ता. भोर) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत गणपत वाघमारे (वय २६), अनिल रवी घोगरेकर, (वय २३, दोघे रा. वडगाव डाळ, ता. भोर) सागर शांताराम पवार (वय २५) या जखमी झालेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही ठिकाणी गारांचाही पाऊस पडला.

    Maharashtra TimesPune Acid Attack: प्रेमप्रकरणातून विकृत सूड! पुण्यात तरुणीसह मित्रावर अ‍ॅसिड हल्ला, आरोपीला हुबळीतून अटक
    शहराच्या वेगवेगळ्या भागांत पडलेला पाऊस
    (सायंकाळी साडेपाचपर्यंत, मिमीमध्ये)

    चिंचवड ६०
    हडपसर ३७.५
    एनडीए २९.५
    भूगाव २१
    शिवाजीनगर १३.१
    पाषाण १३
    कोरेगाव पार्क ९.५
    Maharashtra TimesPune Crime: शेकरु अन् स्टार कासवाच्या तस्करीचा पर्दाफाश; पुणे रेल्वे स्थानक परिसरात DRIची कारवाई, दोन आरोपी ताब्यात
    हडपसरमध्ये रस्ते जलमय
    वानवडी, कोंढवा भागांमध्ये मुसळधार पावसामुळे वानवडी जांभुळकर मळा येथील घरावर भींत कोसळून नुकसान झाले, तर रस्त्यावरील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. वानवडी टेन स्क्वेअर इमारतीच्या परिसरात झाडांची फांदी पडल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. थोड्याच वेळात रस्ते जलमय झाले होते. महमंदवाडी मार्गावर वाडकर मळा येथे रस्त्यावर पाणी साचल्याने, वाहनांमध्ये पाणी शिरले; त्यामुळे अनेक वाहने बंद पडली. मांजरी खुर्द व मांजरी बुद्रुक भागांत ऊसशेतीचे नुकसान झाले व विद्युत खांब वाकडे होऊन वीजपुरवठा खंडीत झाला होता. राजाराम पुलापासून खडकवासल्यापर्यंत विविध भागांत संध्याकाळी जोरदार पाऊस कोसळला.

    जिल्ह्यातही हजेरी
    जुन्नर तालुक्यात वादळीवाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. बांगरवाडी परिसरात सुमारे अर्धा तास गारपीट झाल्याने फळबागांसह इतर पिकांना मोठा फटका बसला. आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने तरकारी पिके, काढणीला आलेली बाजरी; तसेच जनावरांच्या चारापिकांचे नुकसान झाले. लाखणगाव परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांचे शेडचे छप्पर उडाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed