Mount Everest Two Indian Climbers Death: जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’वर चढाई केल्यानंतर खाली उतरताना दुर्घटना घडली. दोन भारतीयांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं?
माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वीपणे पोहोचल्यानंतर खाली उतरताना ही दुर्घटना घडली. आरे यांनी बुधवारी एव्हरेस्ट शिखर सर केले, तर तिवारी गुरुवारी संध्याकाळी ५ः३० च्या सुमारास आठ हजार ८४९ मीटर उंचीच्या शिखरावर पोहोचले होते. आरे हे कॅम्प दोनपर्यंत पोहोचले होते, तर तिवारी हे साऊथ समिटच्या जवळ होते. ‘एक्सपिडिशन ऑपरेटर असोसिएशन ऑफ नेपाळ’चे सरचिटणीस ऋषी भंडारी म्हणाले, ‘शिखरावरून खाली उतरत असताना हे दोघेही प्रचंड थकले होते. त्यांच्या शेर्पाने शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.’
Abhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?
आठ हजार फुटांवरून त्यांचा मृतदेह खाली आणण्यासाठी सहा-सात शेर्पाची मदत घ्यावी लागणार असे सांगण्यात येत आहे. यासाठी एक लाख डॉलरचा खर्च येईल, अशी माहिती तिवारी यांचे बंधू दिनेश तिवारी यांनी दिली. तिवारी हे हैदराबादचे आहेत. तिवारी ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
स्नो ब्लाइंडनेसचा त्रास
एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेले दुसरे गिर्यारोहक संदीप आरे यांनी एव्हरेस्ट गाठल्यानंतर त्यांना स्नो ब्लाइंडनेसचा त्रास होऊ लागला. या परिस्थितीत शेर्षांनी त्यांना कॅम्प दोनपर्यंत खाली आणले. परंतु कॅम्प दोन येथे त्यांचा मृत्यू झाला.
Ritu Tawde: ही तर काँग्रेसची व्होटबँक; बोगस जन्मदाखल्यांबाबत महापौर रितू तावडे यांचा थेट आरोप
५०२ जणांना मिळाली होती परवानगी
नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६च्या मोसमात एव्हरेस्ट चढण्यासाठी ५०२ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली होती. अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचे आपले स्वप्न साकार केले, मात्र, अरुण तिवारी अन् संदीप अरे यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर बेस कॅम्पवर या दोन्ही शूरवीरांसाठी श्रद्धांजली वाहिली जात आहे.
