Abhijeet Dipke Party Account Hack : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं इन्स्टाग्राम खातं हॅक करण्यात आलं आहे. तसेच त्यांचं इंस्टाग्राम अकाउटं हॅक झालं आहे.
कॉक्ररोच जनता पार्टी इनस्टाग्राम अकाउंट हॅक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीने आज शनिवारी सकाळी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्यांचं इंस्टाग्राम अकाउटं हॅक झालं आहे. पार्टीला ते ॲक्सेस करता येत नाहीये. इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आता 2 कोटी 17 लाख झाले आहेत. पार्टीच्या एक्स अकाउंटवरही फॉलोअर्सची संख्या 1 लाख 93 हजार झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी काल शुक्रवारी दावा केला होता की, त्यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी याचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते.
अभिजीत यांचे वडील काय म्हणाले?
दीपके यांनी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. इकडे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे अभिजीत यांचे आई-वडील मुलाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चिंतेत आहेत. अभिजीत यांच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आजचे वातावरण पाहून भीती वाटणं स्वाभाविक आहे. Nashik TCS Case : नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट; तब्बल दीड हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र, इगतपुरीच्या रिसॉर्टचाही उल्लेख अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. अभिजीत यांचे वडील भगवान आणि आई अनिता दीपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, ‘आम्हाला आमच्या मुलाला राजकारणात पाठवायचं नाही. अभिजीतच्या या पावलाबद्दल ऐकून आमच्या रात्रीची झोप उडाली आहे’. अभिजीतच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आजचं वातावरण पाहून भीती वाटणं स्वाभाविक आहे. त्याचे कितीही फॉलोअर्स असले तरी त्यांनी भारतात परतल्यावर त्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली आहे. तो प्रसिद्ध झाला आहे, आणि अशा लोकांना अनेकदा अटक केली जाते. गेल्या दोन रात्रींपासून त्याच्यासोबत काय होऊ शकतं, या चिंतेत मी झोपू शकलो नाहीय’, असं अभिजीतच्या वडिलांनी म्हटलं.
आई काय म्हणाली?
अभिजीत यांच्या आईनं सांगितलं की, ‘आम्हाला कॉक्ररोच पार्टीबद्दल आमच्या एका शेजाऱ्याकडून कळलं होतं. मला वाटतं की माझ्या मुलाने राजकारणापासून दूर राहावं. तो ‘आप’सोबत काम करत होता. त्यावेळीही मी त्याला सांगितलं होतं की, आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि त्याने कोणतीतरी नोकरी करावी’. Latur Crime : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठे खुलासे होणार; लातूरमध्ये दोन डॉक्टरांची चौकशी, सीबीआय पथकाकडून महत्त्वाची कागदं जप्त
अभिजीत दीपकेंचा व्हिडिओ
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, ‘आम्ही एक याचिका सुरू करणार आहोत. ज्यात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तुम्ही सर्वांनी या याचिकेवर जास्तीत जास्त सह्या करा, जेणेकरून सिस्टीमच्या चुकीवर प्रश्न विचारता येतील. काल शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत ऑनलाइन याचिकेवर 4 लाख 86 हजारांहून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत’.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा