पुढील काही दिवसांत ही व्यवस्था प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असून, अधिकृत तिकीट पद्धतीमुळे दलालांमार्फत होणारी आर्थिक लूट थांबेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे. मात्र, या नव्या प्रस्तावामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
Nashik Leopard Attack: जांभळाच्या झाडावर दबा… अन् तासाभरात दोन हल्ले! बोरखिंडमध्ये बिबट्याचा थरार; हिमतीने वाचला जीव
त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत दर्शन सुरू असते. सध्या पूर्व दरवाजाने मोफत रांग आणि उत्तर दरवाजाने २०० रुपयांच्या पेड पासची रांग अशा दोन व्यवस्था आहेत. या दोन्ही रांगा नंदी मंदिराजवळ एकत्र होतात. २०० रुपयांच्या रांगेतील भाविकांना सभामंडपाच्या उत्तर बाजूने पुढे सोडले जात असल्याने त्यांना तुलनेने जलद दर्शन मिळते. नव्या ‘ विराम दर्शन ‘ व्यवस्थेनुसार दर्शनाच्या वेळेत प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे.
ट्रस्टच्या मते, सध्या बाहेरील दलाल २०० रुपयांचे तिकीट काढून भाविकांकडून हजारो रुपये उकळतात आणि त्यांना सामान्य तिकीट रांगेतच सोडतात किंवा ओळखीच्या जोरावर जाळीच्या गेटमधून प्रवेश मिळवून देतात. अधिकृत २५०० रुपयांची पावती सुरू झाल्यास मध्यस्थ दलालांकडून होणारी फसवणूक कमी होईल, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे. दरम्यान, भाविकांमध्ये या निर्णयाबाबत संभ्रमही दिसून येतो.
Nashik TCS Case : नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट; तब्बल दीड हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र, इगतपुरीच्या रिसॉर्टचाही उल्लेख
काय आहे ‘विराम दर्शन’?
त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाने मोफत, तर उत्तर दरवाजाने २०० रुपयांची पेड पासची रांग असते. या दर्शनरांगेत प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे. या ब्रेकदरम्यान २५०० रुपयांचे अधिकृत तिकीट घेतलेल्या भाविकांना सभामंडपाच्या उत्तर दरवाजाने दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यात येईल. त्यालाच ‘ब्रेक दर्शन’ अर्थात ‘उसंत दर्शन’ म्हंटले जाते. यामुळे गर्भगृहाच्या दरवाजापर्यंतचा मार्ग मोकळा राहून तातडीने दर्शन मिळेल. पाच मिनिटांचा ब्रेक संपल्यानंतर नियमित रांग पुन्हा सुरू होईल आणि पुढील तासाला पुन्हा असा ब्रेक दिला जाईल.
Child Death Cases: बालमृत्यू प्रकरणांत हलगर्जी भोवणार! ZPकडून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
गर्दी असल्याचे भासवत भाविकांची लुबाडणूक होते. ती टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने अधिकृत २५०० रुपये आकारून ब्रेक दर्शनाची सुविधा निश्चित केली आहे. प्रत्येक तासाला फक्त पाच मिनिटे नेहमीची दर्शनबारी थांबवण्यात येईल. त्यामुळे रांगेतील भाविकांवरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. –सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंदिर
‘विराम दर्शना ‘साठी असा आहे प्रस्ताव
विराम दर्शनाच्या तिकिटासाठी मंदिर प्रवेशद्वारी स्वतंत्र खिडकी
तिकीट खरेदीसाठी आधार कार्डाप्रमाणे ओळखीचा पुरावा आवश्यक
तिकिटासोबत संगणकीय कोड असलेला मनगटी बँड
मनगटावरील बँड स्कॅन केल्यानंतरच मिळेल प्रवेश
एकदा घेतलेले तिकीट त्या दिवसापुरतेच वैध
