• Sat. Jun 6th, 2026
    Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाहीच; मराठी न शिकल्यास 15 ऑगस्टनंतर कायदेशीर कारवाई

    Marathi Mandatory For Auto-Taxi Drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाइन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

    रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाहीच(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीसक्तीबाबत १५ ऑगस्टनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी जाहीर केली. १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

    प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस राजेश नार्वेकर, रवी गायकवाड, संदेश चव्हाण, डॉ. ना. कों. भोसले आदी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे.

    Maharashtra Timesराज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
    त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.

    मानधनासाठी दोन कोटींची तरतूद
    मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesMount Everest Tragedy: शिखर तर गाठलं, पण परतीच्या वाटेवर अनर्थ; दोन भारतीय गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर सोडला जीव
    प्रशिक्षणाची तयारी
    -सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका
    -प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारणार
    -ओला, उबर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावणार
    -मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करणार

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा