• Sun. Jun 7th, 2026
    पुण्यातील मुख्याध्यापिका ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी जाळ्यात, महिन्यावर आलेली नोकरीला कलाटणी देणारी घटना, त्याआधीच गोत्यात

    Pune NEET Paper Leak : ​सीबीआयच्या तपासात मनीषा हवालदार ही ‘नीट-यूजी २०२६’च्या प्रक्रियेशी थेट संबंधित असल्याचे समोर आले आहे

    मनीषा हवालदार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार (रा. सदाशिव पेठ) हिला अटक केली असून, त्यांची राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन मनीषांना अटक करण्यात आली होती; या अटकेनंतर ‘मनीषा’ नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी ठरल्या आहेत.

    मनिषा हवालदार हिचा थेट संबंध

    सीबीआयच्या तपासात हवालदार ही ‘नीट-यूजी २०२६’च्या प्रक्रियेशी थेट संबंधित असल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती तिच्याकडे उपलब्ध होती. एप्रिल २०२६ दरम्यान तिने भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान तिने दिलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष ‘नीट’ मधील प्रश्न जुळल्याचे निष्पन्न झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

    यापूर्वी सीबीआयने पुण्यातील ब्यूटीपार्लर चालक मनीषा वाघमारे, रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा मांढरे हिला अटक केली होती. कुलकर्णीच्या चौकशीतूनच मांढरेचा सहभाग उघडकीस आला होता. मांढरे ही वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रक्रियेशी संबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. तिने विद्याथ्यांना प्रश्न आणि संभाव्य उत्तरांची माहिती पुरवल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. आता हवालदारच्या अटकेनंतर भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न गळतीच्या तपासालाही अधिक गती आली आहे. चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Navnath Waghmare यांनी थेट जरांगेंचं शिक्षण काढलं, ‘जरांगेंनी पहिला अभ्यास करावा’

    महिनाभरावर होती सेवानिवृत्ती

    मनीषा हवालदार ही येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होती. याचप्रमाणे मांढरे हिचेही सेवेचे शेवटचे काही महिने उरले होते. ‘या दोन्ही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या; तसेच त्यांच्या भेटीदेखील होत असत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
    Maharashtra TimesTwisha Sharma Death : मी ज्या-ज्या लोकांशी फोनवर बोलले ते फक्त सांत्वनाच्या हेतूने होते! ट्विशाच्या मृत्यूनंतर फोनाफोनीवर सासूचे स्पष्टीकरण

    प्रशालेकडून हवालदारवर निलंबनाची कारवाई

    नीट पेपरफुटी प्रकरणात शेठ हिरालाल सराफ प्रशालेची मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिचे नाव समोर आल्यानंतर विद्या प्रसारिणी सभेने हवालदारवर निलंबनाची कारवाई केली असून, पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, ‘१०३ वर्षांची परंपरा असलेल्या विद्या प्रसारिणी सभेने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे. अशा प्रकारच्या गैरकृत्याला संस्थेचा कोणताही पाठिंबा नाही,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘या प्रकरणाशी संस्था किंवा शाळेचा कोणताही संबंध नसून, संबंधित शिक्षिकेच्या वैयक्तिक कृतींसाठी संस्थेला जबाबदार धरता येणार नाही; असेही म्हटले आहे. निरपराध शिक्षक, कर्मचारी आणि विद्याथ्यांची बदनामी होऊ नये, अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली.

    NEET Paper Leak Manisha Hawaldar  Maharashtra Times (1)

    सीबीआयने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगरसह देशातील विविध भागांत छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली असून, लॅपटॉप, मोबाइल फोन, बैंक व्यवहारांची कागदपत्रे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटमधील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Maharashtra TimesRajya Sabha Election : सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने रिक्त, राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची शॉर्टलिस्ट, महाराष्ट्रातील मंत्र्याचं नाव चर्चेत

    हार्ड डिस्क, साहित्य जप्त

    सीबीआयच्या पथकाने शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि वाघमारे यांच्याकडे केलेल्या चौकशीत मनीषा हवालदार हिच्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी केली. हवालदार हिला ताब्यात घेऊन त्यांच्या संगणकाची हार्ड डिस्क व अन्य साहित्य सीबीआयने जप्त केले,
    अशी माहिती सूत्रांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा