• Sat. Jun 6th, 2026
    Nashik TCS Case : नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट; तब्बल दीड हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र, इगतपुरीच्या रिसॉर्टचाही उल्लेख

    म.टा.प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर अत्याचार आणि तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने 18 साक्षीदारांच्या जबाबासह मुबलक पुराव्यांचे दोषारोपपत्र नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दीड हजारांहून जास्त पानांचे हे दोषारोपपत्र असून, उर्वरित आठ गुन्ह्यांबाबत पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होणार आहे.

    नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

    देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात 26 मार्च रोजी अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरुन दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या तीन संशयितांविरुद्ध अत्याचारासह धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद आहे. त्यापैकी दानिश व तौसिफ यांना एसआयटीने पुढील 28 मार्चपर्यंत अटक केली होती. तर, पसार असलेल्या निदा खान हिला 7 मे रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेण्यात आले. निदाच्या जामीन अर्जावर 25 मे, तर दानिश व तौसिफच्या जामिनाबाबत 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. या गुन्ह्याला 26 मे रोजी 60 दिनस पूर्ण होत असल्याने शुक्रवारी नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
    Manisha Hawaldar : पुण्यातील मुख्याध्यापिका ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी जाळ्यात, महिन्यावर आलेली नोकरीला कलाटणी देणारी घटना, त्याआधीच गोत्यात

    दोषारोपपत्रात काय काय?

    संशयित दानिश याने पीडितेवर इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये अत्याचार केले.

    संशयित दानिश याने पीडितेला लोणावळा येथे नेले होते; तेथील पुराव्यांचा समावेश

    संशयित दानिश, तौसिफ आणि निदा यांनी पीडितेच्या धर्मांतराचा प्रयत्न केला.

    पीडितेच्या घरातून संशयितांच्या धर्मांतील महिलांचा पोशाख, धार्मिक पुस्तके जप्त

    संशयित निदा हिने पीडितेला दिलेल्या 171 सोशल मीडियावरील लिंक्स व त्याच्या विश्लेषणाचा समावेश

    पॉश सदस्यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नातलगांचे जबाब

    संशयितांच्या मोबाइलमधून संकलित पुराव्यांसब प्रत्यक्ष संकलित पुराव्यांचा समावेश

    कट रचून धर्मांतराच्या प्रयत्नाचे वाढील कलम

    अॅट्रॉसिटी कायद्यान्वये देवळाली कॅम्पच्या गुन्ह्यात वाढील कलम
    Maharashtra TimesLatur Crime : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठे खुलासे होणार; लातूरमध्ये दोन डॉक्टरांची चौकशी, सीबीआय पथकाकडून महत्त्वाची कागदं जप्त
    दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि विशेष सरकारी वकील अजय मिसल यांनी नुकताच एसआयटीच्या तपासाचा मागोवा घेतला होता. त्यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक निरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक भाईदास माळी यांच्यासह पथकाने तपासाची संपूर्ण माहिती सादर केली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर निदाच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याने तिचा जामीन मंजूर होणार का? याकडे राज्यासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed