Mumbai-Pune Expressway: 16,000 कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहा पदरीकरण रखडणार आहे. निधी आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब होण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मे महिन्यात कनेक्टिंग लिंक प्रकल्पाला सुरुवात झाल्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट झाला आहे. प्रवासात वेळ वाचत असून अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. या प्रकल्पानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहा पदरीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी आशा होती. परंतु, या दहा पदरीकरणाला विलंब होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कायम राहणार आहे.
कनेक्टिंग लिंकवर आठ पदरी वाहतूक
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे. प्रत्येक बाजूने तीन-तीन असे लेन आहेत. नव्या कनेक्टिंग लिंकमधील बोगद्यांमध्ये आठ पदरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहनं जेव्हा कनेक्टिंग लिंकवरून जुन्या द्रुतगती महामार्गावर प्रवेश करतील तेव्हा वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. तसेच, द्रुतगती महामार्गावर दररोज सुमारे 60 ते 70 हजार वाहनांची वाहतूक होते. वीकेंडला तर हा आकडा एक लाखावरही पोहोचतो. येत्या काही वर्षांत ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीला सहजपणे सामावून घेण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Shaktipeeth Expressway: मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2000 मध्ये सुरू केलेला 94.6 किलोमीटर लांब मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहा पदरीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकार समोर मांडला आहे. यानंतर प्रस्ताव मंजूर होताच काम सुरू होण्याची अपेक्षा असताना प्रशासनाने यामध्ये काही तांत्रिक अडचणी दाखवून दिल्या. हे बदल करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश MSRDCला देण्यात आले आहेत. त्याशिवाय पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे राज्यावर आर्थिक दबाव वाढत आहे अशी माहिती MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी TOIला दिली. या प्रकल्पासाठी एकूण 16,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या निधीबाबत चिंता व्यक्त केली जात असल्यामुळे प्रकल्प लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
पर्यायी उपायांचा शोध
2030पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं रुपांतर ‘सुपर हायवे’मध्ये करण्याचं MSRDCचं उद्दिष्ट होतं. यामुळे वाढत्या वाहतूक कोंडीची चिंता मिटली असती. पण आता या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बदलांवर सध्या काम सुरू असले तरी प्रकल्पासाठी निधी मिळवण्यात अडचणी कायम आहेत. त्यात इंधन दरवाढ, बांधकाम खर्च, काँक्रिटच्या वाढत्या किंमतींचा राज्यभरातील सर्व प्रकल्पांवर परिणाम होईल अशी महिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
Pune Metro: ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?
दरम्यान, महामंडळ सध्या अंतर्गत साधनांचा वापर करून किंवा ‘अॅन्युइटी-आधारित मॉडेल’द्वारे निधी उभारणीच्या पर्यायांवर चर्चा करत आहे. याशिवाय महामार्गावरील टोलवसुलीचा कालावधी 2045च्या पुढे वाढवण्याचा पर्यायही सध्या चर्चेत आहे. या प्रक्लपासाठी तब्बल 85 हेक्टर जमीन वापरण्याच येणार असून, 200 कोटींचा खर्च करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यापैकी बहुतांश जमीन द्रुतगती महामार्गाच्या बाजूलाच असल्यामुळे MSRDCच्या ताब्यात आहे. यामुळे केवळ कामशेत, खंडाळा, आडोशी, माडप आणि भातण या बोगद्यांच्या परिसरातील जमीनीचं भूसंपदान करण बाकी आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा