Monsoon Update: शुक्रवारी शहरात हलक्या सरींची नोंद झाली असून शनिवारीही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम राहिलं असून आर्द्रतेमुळे अद्याप तापमान दिलासा नाहीच मिळणार.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वाढलेली आर्द्रता, ढगाळ आकाश, अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून यामुळे मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असले तरी मान्सूनपूर्व सरींचे आगमन झालेले नाही. त्यामुळेच वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याला मुंबईकर तोंड देत आहेत. रात्रीच्या वेळीही तापमानाचा पारा फारसा खाली जात नाही. परंतु, शुक्रावारी उपनगरात हलका पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी सकाळीही शहरातील काही भागांत रिमझिम पावासाची जाणीव झाली.
मान्सूनपूर्व सरी दाखल झाल्या नाहीत
शुक्रवारी दिवसभर वातावरणामुळे ढगाळ मुंबईकरांनी उकाड्याचा त्रास अनुभवला. कुलाबा येथे ३५, तर सांताक्रूझ येथे ३४.५ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून मोठ्या फरकाने अधिक नसतानाही अस्वस्थता मात्र पराकोटीची होती. किमान तापमान कुलाबा येथे २८, तर सांताक्रूझ येथे २९ अंश से. नोंदला गेला. कमाल आणि किमान तापमानात फारसा फरक नसल्याने ही अस्वस्थता सातत्यपूर्ण आहे. वातावरणात ८० आर्द्रतेचे प्रमाण सकाळी टक्क्यांच्याही पुढे आहे; तर दिवसभर ७० टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या पश्चिम दिशेकडून वारे वाहत असल्याने आर्द्रता अधिक असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. यासोबतच ढगांची द्रोणीय स्थितीही दक्षिण कोकणात मेघगर्जनांसाठी कारणीभूत आहे. ही स्थिती आणखी किमान दोन ते तीन दिवस कायम राहू शकते. अजूनही मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी दाखल झालेल्या नाहीत, त्यामुळे तापमानात घट होण्याचीही चिन्हे नाहीत.
Mumbai Rain: उन्हाने तापलेल्या रस्त्यांवर ओल्या सरी; मुंबईत अखेर पावसाची हजेरी, ‘आयएमडी’चा ताजा अंदाज जाहीर
महामुंबई परिसरात शुक्रवारी काही ठिकाणी शिडकावा झाला. कर्जत परिसरामध्ये वाऱ्यांचा वेगही अधिक होता. प्रादेशिक हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कोकण विभागातील हवामान विभागाच्या केंद्रांवर शुक्रवारी दिवसभरात पावसाची नोंद झाली नाही. कृषी केंद्र तसेच स्वयंचलित केंद्रांवर नोंद झाली असेल, असे सांगण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसून आले. सकाळी 7च्या दरम्यान हलका शिडकावाही झाला. त्यामुळे तापमानात काहीशी घट झालेली जाणवते. रायगड जिल्ह्यात हलक्या सरींची, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रविवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत कोरडेच वातावरण असेल. परिणामी, अस्वस्थतेमध्येही वाढ होऊ शकते.
खोपोली, कर्जत परिसरात मुसळधार
खालापूर, खोपोली आणि कर्जत परिसरात शुक्रवारी संध्याकाळी वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. संध्याकाळी पाच ते सहाच्यादरम्यान आभाळात काळे मेघ दाटून आल्याने काळोख पसरला होता. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा