• Sat. Jun 6th, 2026
    Ritu Tawde: ही तर काँग्रेसची व्होटबँक; बोगस जन्मदाखल्यांबाबत महापौर रितू तावडे यांचा थेट आरोप

    BMC Mayor Ritu Tawde: ही केवळ दोन वर्षांची आकडेवारी आहे. यापेक्षा आणखी मागे जाऊन पाहिल्यास आणखी मोठी संख्या पुढे येईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

    रितू तावडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ‘मुंबईमध्ये जन्मदाखल्यांच्या ८० हजारांहून अधिक नोंदी बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या बोगस दाखल्यांचा अभ्यास केला असता त्यातील बहुतांश दाखले एका समाजाचे असल्याचे दिसून येते. यामागचे कारण म्हणजे काँग्रेसने व्होटबँक वाढविण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता’, असा थेट आरोप मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी केला.

    महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. सर्वप्रथम सर्वाधिक गंभीर मानल्या जाणाऱ्या बोगस जन्मदाखल्यांबाबत त्यांना विचारण्यात आले. हे नेमके कशासाठी करण्यात आले असावे, असे विचारताच महापौर म्हणाल्या, ‘एका विशिष्ट समाजातील लोकांच्या नावावर बहुतांश दाखले आहेत. व्होटबँक टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काँग्रेसने केलेला हा प्रयत्न होता.’

    Maharashtra TimesParty Formation Process : कॉकरोच जनता पार्टी फक्त सोशल मीडिया पेज, खराखुरा राजकीय पक्ष स्थापित करण्यासाठी काय करावं लागतं?
    मुंबईत बंद पडलेले जलतरण तलाव, सायकल ट्रॅकची दुरवस्था याकडेही वार्तालापामध्ये महापौरांचे लक्ष वेधण्यात आले. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई आणि फुटपाथ याबाबत महापौर म्हणाल्या, ‘२५ वर्षांपासून मुंबईची पुरती वाट लावून टाकली. फुटपाथ हा मूळ मुंबईकरांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.’ हे नमूद करताना त्यांनी या कारवाईची दुसरी मजेशीर बाजूदेखील सांगितली. रस्त्यावर, फुटपाथवर विक्रेते दिसत नसल्याने आम्ही भाजीपाला कुठे खरेदी करायचा ? असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जातो, असे तावडे म्हणाल्या. यावर त्यांचे लक्ष मुंबईतील मंडयांच्या दुरवस्थेकडे वेधण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मंडई नीट असायला हव्यात, यात शंकाच नाही.

    पुनर्विकासात विकासक तळमजल्यावरील गाळे स्वतःकडे ठेवतात आणि मंडईसाठी पहिल्या मजल्यावर जागा देतात. अशा ठिकाणी कुणी खरेदीसाठी जात नाही. त्यामुळे चांगल्या मंडईसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.’ अनियमित फुटपाथ, विकासकांकडून केली जाणारी तोडफोड याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

    Maharashtra TimesEl Nino: यंदाच्या खरीपावर ‘एल निनो’चं संकट! राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज, प्रभाव कधीपासून दिसणार?
    हरित बेटे विकसित करणार
    मुंबईचे प्रदूषण वाढत आहे आणि दुसरीकडे झाडांची संख्या कमी होत आहे. हे पाहता मुंबईत हरित बेटे विकसित करणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे रितू तावडे म्हणाल्या. मुंबईत जागेचा तुटवडा आहे, परंतु जिथे कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी हरित पट्टा करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

    कथित कॅथ लॅब घोटाळा, तानाजी सावंत मनसेच्या निशाण्यावर! संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप

    झाड दुर्घटनेबाबत धोरण आवश्यक
    मुंबईत झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेकदा झाडे खासगी जागेत असल्याचे सांगत महापालिका हात वर करते. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाल्या, ‘झाड पडून जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटना दुर्दैवी आहेत. पालिकेच्या जागेतील आणि खासगी जागेतील झाड असा भेदभाव व्हायला नको, हे मान्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक धोरण आखण्याची गरज असून, त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असेल.’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा