Aqua Line Connectivity: तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी मेट्रो अर्धा तास बोगद्यामध्येच थांबून राहिली. त्यावेळी नेटवर्कअभावी प्रवाशांचे हाल झाले त्यामुळे ॲक्वा लाइनमध्ये नेटवर्क सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: भुयारी मेट्रो-३मध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड होऊन मार्गिका दोन वेळा ठप्प झाल्याने मोबाइल नेटवर्कच नसल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ (अॅक्वा लाइन) मार्गिकेवर मोबाइल नेटवर्क उपलब्ध होणार असून, प्रवाशांचे मोबाइल खणखणणार आहेत.
तासभर सेवा ठप्प
भुयारी मेट्रो-३मध्ये शुक्रवारी दोन वेळा तांत्रिक बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणेत त्रुटी निर्माण होऊन ही मार्गिका सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दुपारी पाऊण ते दीड या कालावधीत ठप्प झाली होती. प्रवाशांच्या मोबाइलमध्ये नेटवर्कच नसल्याने आणि अडकलेल्यांच्या स्थितीची माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने भीतीने प्रवाशांची गाळण उडाली होती. या पार्श्वभूमीवर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीचे अधिकार दिल्याची बाब ‘एमएमआरसीएल ‘ने एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये इन-बिल्डिंग समोर आली आहे. भारती सोल्यूशन्स प्रणाली उभारणे, तिचे संचालन आणि देखभालीची जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून मेट्रो स्थानकांमध्ये तसेच बोगद्यांमध्ये अखंड व्हॉइस आणि डेटा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
Bike Taxi : पेट्रोलवरील बाइक टॅक्सीला मुभा द्या, कंपन्यांची मागणी; सरनाईक म्हणतात, राज्य सरकारच्या धोरणाविरोधात ठरेल
मोबाइल नेटवर्क सेवांबाबत मेट्रो-३ मार्गिकेवर काही काळ अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, नव्या निर्णयामुळे प्रवाशांना पुन्हा मोबाइल सेवेचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार कंपन्या लवकरच आवश्यक यंत्रणा उभारून सेवा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. मात्र, यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर झालेली नाही. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, अखंड आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. भुयारी प्रवासादरम्यान इंटरनेट आणि कॉलिंग सेवा खंडित होण्याच्या तक्रारी कमी होणे अपेक्षित आहे, असे ‘एमएमआरसीएल’ कडून सांगण्यात आले.
प्रवासी भयग्रस्त
भुयारी मेट्रो-३चा प्रवास शुक्रवारी मुंबईकरांसाठी भीतीदायक ठरला. भुयारी मेट्रोत दोन वेळा तांत्रिक बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणेत त्रुटी निर्माण होऊन ही मार्गिका सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दुपारी पाऊण ते दीड या कालावधीत ठप्प झाली. त्यातच प्रवाशांच्या मोबाइलमध्ये नेटवर्कच नसल्याने आणि अडकलेल्यांच्या स्थितीची माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने भीतीने प्रवाशांची गाळण उडाली.
Pune Metro: ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?
कफ परेड ते आरे अशा मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील सिग्नल यंत्रणेत शुक्रवारी दोन वेळा बिघाड झाला. बिघाडामुळे नियंत्रण कक्षातून सिग्नल हाताळणी शक्य झाली नाही. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी, साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाला. तब्बल तासाभरानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीनंतर मेट्रो धावू लागली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा