पुणे : पुणे शहरात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून आंदेकर-कोमकर टोळीयुद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला अद्यापही सुरू असल्याची चर्चा असतानाच, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आकाश मस्के याचा भाऊ बाळा मस्के याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पुण्यातील बालाजीनगर बसस्टॉपजवळ काही हल्लेखोरांनी भरदिवसा आधी बाळा मस्केवर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याला संपवलं. भर रस्त्यात झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. प्राथमिक तपासात हा खून जुन्या टोळीयुद्धातून आणि सूडाच्या भावनेतून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आंदेकर आणि कोमकर टोळीयुद्ध
आंदेकर आणि कोमकर गटातील संघर्ष मागील काही वर्षांपासून पुणे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या झाली होती. आयुष कोमकरच्या हत्येनंतर आता बाळा मस्केच्या खुनामुळे हे टोळीयुद्ध पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून नेमके काय प्रयत्न केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा