Weather Update: जूनच्या प्रारंभी मुंबईत मान्सूनपूर्व सरींमुळे पारा खाली घसरतो आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतो. पण यंदा मान्सूनच्या रखडलेल्या प्रगतीमुळे मुंबई एखाद्या भट्टीप्रमाणे तापून निघाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईत काही दिवसांपूर्वीच जून महिन्यातील गेल्या 10 वर्षांमधील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं होतं. तसेच, शुक्रवारी रात्री गेल्या 57 वर्षांमधील शहरातील सर्वात उष्ण वातावरण नोंदवण्यात आलं. किमान तापमान 30 .2 अंश सेल्सिअस होतं. हेच तापमान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील हर्णे येथेही नोंदवण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत ऐन जून महिन्यात असं हवामान का आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मान्सूनचा प्रवास रखडला
सूर्यास्तानंतरही आपलं शहर थंड होत नाही आहे त्यामुळे रात्री दमट व उष्ण वातावरणात रहावं लागतं. हवामान तज्ज्ञांच्या मते जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही दिवसांत रात्रीचं तापमान हा विक्रमी पाराही ओलांडेल. त्यामुळे मान्सूनच्या गार सरींऐवजी मुंबईकरांना घामाच्या धारा सोसाव्या लागणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक दिवसांपूर्वीच दाखल झाला. पण त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास रखडला. त्यामुळे मुंबईमध्ये उकाडा वाढला आहे. मुंबईकर आता मान्सूनपूर्व उष्णता सहन करत आहेत.
Weather Update: मान्सूनसाठी २० जून उजाडणार? महामुंबईत ‘चटका’ कायम राहणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट
या काळात मुंबईमध्ये साधारणपणे मान्सूनपूर्व पाऊस बरसत असतो. त्यात मान्सूनचे ढगही शहरावर असतात. यामुळे सूर्य मावळताच पारा खाली उतरतो. पण यंदा ढगाळ वातावरण आणि पावसाच्या अभावी दिवसभरातील उष्णता आणि आर्द्रता शहरावर साठून राहते. त्यात अरबी समुद्रावरून दमट वारे शहराच्या दिशेने वाहत राहिल्यामुळे उष्मा असह्य होतो. या वाऱ्यांमुळे शहरातील आर्द्रता मोठा प्रमाणात वाढते. यामुळेच रात्रीही वातावरणात उष्णता कायम राहते. आर्द्रतेमुळे जमिनीवरील उष्णता वातावरणातच अडकून राहते.
कारण काय?
अरबी समुद्राचं तापमान नेहमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वातावरण आर्द्रता वाढते. त्या पावसाच्या अभावामुळे दिवस-रात्र मुंबईकरांना उष्मा सहन करावा लागत आहे. आणि अशा वातावरणात मुंबईकरांना ओढ लागली ती मान्सूनची.
1950नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती, Super El Ninoची 63 टक्के शक्यता; डिसेंबरपर्यंत तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज
मध्य भारतात कोरडी हवा निर्माण झाली आहे. त्यात अरबी समुद्रवार अनुकूल हवामान प्रणाली विकसित न झाल्यामुळे मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास रखडला आहे. येत्या काही दिवसांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पण शहराला अजून मोसमी पावसाचीच प्रतीक्षा आहे. मान्सूनला पुन्हा वेग मिळेपर्यंत मुंबईत रात्रीचं वातावरण असामन्यपणे दमट आणि उष्ण वातावरण कायम राहणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा