• Sun. Jun 14th, 2026

    Pune News: पुण्यात सात-बारा दुरुस्तीची भीती; १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, तहसीलदारांसह तलाठ्यांचे धाबे दणाणले!

    Pune News: पुण्यात सात-बारा दुरुस्तीची भीती; १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, तहसीलदारांसह तलाठ्यांचे धाबे दणाणले!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ३७ हजार सात-बारा उताऱ्यातील चुका शोधल्यानंतर त्यातील दोषी १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई सरकारने केली आहे. या प्रकारच्या कारवाईच्या भीतीमुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तहसीलदार सातबारातील विविध प्रकारच्या दुरुस्ती करण्यास धजावत नसल्याची माहिती समोर आली आहे.

    भूमी अभिलेख विभागाने केलेल्या सातबारा संगणकीकरणात अनेक चुका झाल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्याची महसूल कायद्यातील कलम १५५ नुसार तरतूद आहे. त्यानुसार, सात-बाऱ्यातील नावे चुकविणे, क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, वारसाच्या नोंदी वैध आणि कायदेशीर नोंदी दुरुस्त केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे कलम १५५ चा गैरवापर केल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार नाशिकचे विभागीय आय़ुक्त प्रवीण गेडाम यांच्या समितीने जिल्ह्यातील ३८ हजारांहून अधिक सातबारांची तपासणी केली होती. त्यात अनेक दोष आढळले. एकूण प्रकरणांपैकी ४२४ सातबारा प्रकरणांमध्ये दोष आढळला होता.

    ती सर्व प्रकरणे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पुनर्विलोकनात घेऊन गुवणत्तेवर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०२० ते २०२५ या काळातील सुमारे ३८ हजार; तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक सात-बारा प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

    तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यासारख्या अधिकाऱ्यांवर संक्रात आली आहे. समितीने दिलेल्या अहवालानुसार, त्या १५ अधिकाऱ्यांवर अतिगंभीर स्वरुपाचे आरोप ठेवण्यात आले. त्यानुसार त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आली. त्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकाऱ्यांसह तलाठ्यांचा समावेश आहे. ही कारवाई होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महसूल कायद्यातील कलम १५५ नुसार सात-बारा दुरुस्त करण्याचे प्रकरण ताजे आहे. त्यामुळे कलम १५५ नुसार सात-बारा दुरुस्ती करण्यास तहसीलदार धजावत नाहीत. विना फेरफार; तसेच पोकळी हिस्सा संदर्भातील काही नोंदी काढण्याची तरतूद कलम १५५ मध्ये करता येते. त्या प्रकारच्या तसेच अन्य प्रकारच्या दुरुस्त्यादेखील करण्यास तहसीलदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

    दरम्यान, ‘संगणकीकरणातील काही चुका आहेत. त्या दुरुस्तीची गरज असल्याचे मत तहसीलदारांकडून व्यक्त करण्यात आले. मात्र, कोणतीही दुरुस्ती केली; तर त्याच्यावर ठपका ठेवून कारवाई होईल, या भीतीने कलम १५५ नुसार सात-बारा दुरुस्तीच्या प्रकरणांना हातच लावत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो सात-बारा दुरुस्तीची प्रकरणे प्रलंबित आहेत,’ अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed