• Fri. Jun 5th, 2026
    दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एकाच ठिकाणी


    Latest Marathi News: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मंगळवारी प्रतिलिटर ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात झालेली ही दुसरी दरवाढ असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच इंधनाच्या दरांत प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, असाध्य आजारग्रस्त, पिसाळलेल्या, घातक आणि आक्रमक भटक्या कुत्र्यांना ठार करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. अशा कुत्र्यांचा मानवी जीवनाला असलेला धोका दूर करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने प्रथमच ही परवानगी देताना भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना निवारागृहात सोडण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed