Chandrashekhar Bawankule: राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात, त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याबद्दल विचारले असता राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात, त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. पक्षांमधील वाटाघाटी, देवाण-घेवाण आणि समन्वय समितीच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सर्व पक्ष सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Nagpur News: बारा वर्षांचा संसार, पदरात 2 लेकरं, बायको घर सोडून गेली; कौटुंबिक कलहातून पतीचा टोकाचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना भेटतात तेव्हा केवळ राजकीय विषयांवर चर्चा होत नाही. मतदारसंघातील प्रश्न, विकासकामे आणि युतीतील समन्वय यासंदर्भातही चर्चा होत असते. त्यामुळे कोणाची भेट झाली म्हणून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस यासंदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोडी कॉमेडी, थोडं इमोशनल केलं; गडकरींसमोर नाना पाटेकर यांचं भावुक भाषण
मंत्र्यांना ऑनलाइन उपस्थितीची परवानगी
मंत्र्यांच्या ऑनलाइन उपस्थितीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, काही बैठकींमध्ये संबंधित विषय नसल्यास काही मंत्री ऑनलाइन सहभागी होऊ शकतात. ज्या मंत्र्यांचे विषय असतात ते प्रत्यक्ष उपस्थित राहतात. पंतप्रधानांनी दिलेल्या बचतीच्या संदेशामुळे खर्च आणि वाहतूक कोंडी कमी होत आहे. काही मंत्र्यांना ऑनलाइन सहभागी होण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nitin Gadkari: कंटेनर अडकले, माल सडला; अमेरिका-इराण युद्धामुळे गडकरींच्या कुटुंबाला कोट्यवधींचा फटका
राजकारण न करता पाठिंबा द्या
पेट्रोल दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, आखाती देशांमधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या काळात देशहितासाठी केलेल्या आवाहनाचा उल्लेख करत नागरिकांनी देशाच्या मजबुतीसाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. देश टिकला तर आपण टिकू. कोणतेही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठबळ दिल्यास आपण या संकटातून बाहेर पडू, असे ते म्हणाले.
