रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे हा पूल कोसळल्याची गंभीर बाब समोर आली असून, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या गावांसाठी होता महत्त्वाचा दुवा
जांभूळपाडा मार्गे आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात होता. कमी वजन क्षमतेचा आणि अरुंद असलेला हा पूल स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय होता. मात्र, काही उद्योजक आणि व्यावसायिकांकडून या पुलावरून सातत्याने डंपर आणि हायवा सारख्या अवजड वाहनांची वाहतूक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाने दखल घेतली नाही
स्थानिकांनी याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तरीही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर पुलाने भार सहन न करता कोसळल्याची चर्चा आहे. “प्रशासनाने वेळेत दखल घेतली असती, तर ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Nagpur Crime: ‘मला शेवटचं बघून घे’; प्रेयसीशी Video Call सुरू असतानाच तरुणाचं टोकाचं पाऊल, धक्क्यातून तरुणीनेही…
नागरिकांवर संकट
पावसाळा अगदी तोंडावर असताना पूल कोसळल्याने आता स्थानिक नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दैनंदिन प्रवास, बाजारपेठ, आरोग्य सेवा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ये-जा यावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. काही दिवसांत शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
नव्या पुलाची मागणी
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या घटनेनंतर पुलांच्या सुरक्षेबाबत आणि अवजड वाहनांच्या नियंत्रणाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तसेच नवीन मजबूत पूल उभारण्याची मागणी केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा