मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही काही काळ निर्बंध आणत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी खासगी वाहनांचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याऐवजी मेट्रो, इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच वर्क फ्रॉम होम, खाद्य तेलाचा वापार कमी करणे, विदेशात जाणं टाळावं, अशादेखील सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा ताफा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक वाहनं असतात. पण आता इंधनाचा वापर जपून करायचं असल्याने आता ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच मंत्री असो किंवा बडा अधिकारी, त्यांच्या विदेश दौऱ्यावर तात्पुरते निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
“मला विरोधी पक्षांना सांगायचं आहे, ज्यावेळी जागतिक संकटाची परिस्थिती असते, त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांनी काही उपाययोजना सांगितल्या त्या तुमला करता येत नसतील तर किमान थट्टा, मस्करी तरी करु नका. आज जगासमोर संकट आहे. भारतासमोर नाहीय. म्हणून आपलं परकीय चलन वाचलं पाहिजे. आपल्या इथे महागाई वाढू नये या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी याांनी सांगितलेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला थोडी जीवनशैली बदलली तरी आपण देशाला मदत करु शकू. पंतप्रधान मोदींनी केलेल्या अवहानानुसार सहा महिने जरी जीवनशैली बदलली तरी दिलासा मिळेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “विरोधी पक्षाने कितीही थट्टा मस्करी केली, तरी वैश्विक संकटात आपण देशाच्या पाठिशी उभे राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, मंत्र्यांचा ताफा कमी होणार
“महाराष्ट्रातदेखील आम्ही निर्णय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे ताफे हे छोटे करतोय. अधिकारी असतील किंवा मंत्री असतील, त्यांच्या विदेश यात्रांवर निर्बंध आणतोय. ज्या गोष्टींमध्ये परकीट चलन कमी होतंय त्या गोष्टींची खपत कमी कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या देशी गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे काही एका दिवसांत होणार नाही. पण आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण पूर्ण करु शकतो. देशाच्या पंतप्रधानांनी केवळ सहा महिने मागितले असतील तर ते न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
नागपूर विमानतळाबाबत फडणवीस काय म्हणाले?
“मला अतिशय आनंद आहे की, नागपूर विमानतळ म्हणून एक ब्राऊनफिल्ड एअरपोर्ट नव्याने डेव्हलोप करण्याकरता मागच्या काळात महाराष्ट्र सरकारने टेंडर दिलं होतं. त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता मंत्रिमंडळाची परवानगी हवी होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपूरला अतिशय सुंदर ब्राउनफिल्ड एअरपोर्ट तयार करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
फडणवीस कुंभमेळ्याच्या नियोजनावर काय म्हणाले?
“आमची आज साधू, महंतांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय-काय केलं आहे, याचे प्रेजेन्टेशन केलं. त्यांच्या माध्यमातून काही सूचना आल्या. त्याबाबत कारवाई करायला सांगितले. एक अतिशय भव्य आणि दिव्य कुंभ झाला पाहिजे. जे भाविक येतील, जे साधू-संत येतील त्यांची चांगल्यात चांगली सोय झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही प्लॅन केला आहे. साधू संतांचे देखील आम्हाला मोठे सहकार्य लाभत आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा