Nanded Political News : राज्यातील विधान परिषदेच्या 17 पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 11 जागेसाठी 18 जूनला म्हणजे उद्या मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हिंगोली खासदार नागेश पाटील आष्टीकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असताना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरदार रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. त्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश असून काल रात्री ते हदगावहून हैद्राबाद मार्गे दिल्लीला विमानाने रवाना झाल्याची माहिती आहे. एकंदरीत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेने शिवसेना ठाकरे गटाकडून नांदेड विधान परिषदेची निवडणूक लढत असलेल्या मुलाची मात्र चांगलीच धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नगरसेवक देखील मतदान कोणाला करायचे यावरून संभ्रमात पडले आहेत.
ऑपरेशन टायगरची चर्चा सातत्याने
राज्यात मागील दोन वर्षापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सातत्याने सुरु आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची दिल्लीवारी तसेच शिंदे गटाच्या नेत्यांची भेटी संदर्भातील चर्चा रंगल्या. मात्र, आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचं खासदाराकडून खुलासा केला जात होता. त्यातच मागील दोन दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चेने जोर धरला असताना परभणीचे खासदार संजय जाधव आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे नांदेड विमानातळावरून विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे हदगावहून हैद्राबाद मार्गे दिल्लीला गेल्याची माहिती आहे. या हालचालीमुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Sushma Andhare: मला एका खासदाराचा फोन आलेला, दोन खासदार पक्षफोडीचे म्होरके; नाव घेत सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत. अशातच प्रचाराला एक दिवस शिल्लक असताना वडिलांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्या चर्चेने कृष्णा आष्टीकर यांची मात्र धाकधूक वाढल्याचं चित्र आहे. कृष्णा आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ 19 संख्याबळ आहे. तर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी सोबत आहे. Tribal Student School Uniform : अखेर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार; आश्रमशाळांमध्ये कधीपर्यंत ड्रेस उपलब्ध होणार; मंत्री अशोक उईकेंची माहिती
मतदार मात्र संभ्रमात
अशातच नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मतदार मात्र संभ्रमात पडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील संभ्रमात पडले आहेत. नांदेड विधान परिषदेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने ऐनवेळी काँग्रेसला माघार घ्यावी लागली, शिवाय रामदास पाटील यांना आपली उमेदवारी माघार घ्यायला लावले. आता नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात जाणार असल्याने काँग्रेसचे नेते आणि नगरसेवक चलबिचल झाले आहेत. दरम्यान, या घडामोडीचा फायदा भाजपचे उमेदवार अमर राजूरकर यांना होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा