• Sat. Jun 6th, 2026

    मुंबईत म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; 610 घरांच्या किंमतीत 7.5 टक्के कपात, घाटकोपर, वांद्रे, दादरमध्ये हक्काचे घर मिळणार

    मुंबईत म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; 610 घरांच्या किंमतीत 7.5 टक्के कपात, घाटकोपर, वांद्रे, दादरमध्ये हक्काचे घर मिळणार

    MHADA Lottery deadline extended: म्हाडाच्या मुंबई मंडळाने कन्नमवार नगर-विक्रोळीयेथील 610 सदनिका उच्च उत्पन्न गट प्रवर्गासाठी राखीव ठेवल्या असून, ऑनलाइन लॉटरी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मे पर्यंत वाढवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची मुदत आता २८ मेपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यामुळे इच्छुक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा कालावधी वाढवण्यात आल्याने सोडतीतील प्रतिसाद, किंमत आणि उत्पन्न गटांतील बदलांवर चर्चा रंगू लागली आहे.

    घरासोबत एक वाहनतळ विनामूल्य

    मुंबई मंडळाने यावेळी विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर प्रकल्पातील १,२२१ घरांपैकी ६१० सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या घरांसाठी स्वतंत्र संकेत क्रमांक तयार करण्यात आले असून, या सदनिकांच्या किंमतीत यापूर्वी जाहीर केलेली ७.५ टक्के कपात कायम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक घरासोबत एक वाहनतळ विनामूल्य देण्याचाही निर्णय मंडळाने घेतला आहे.Maharashtra TimesMumbai Local: मुसळधार पावसातही लोकल धावती राहणार! रेल्वे स्थानकांवर कामं सुरू; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर होणार

    कन्नमवार नगर प्रकल्पातील या घरांच्या किंमती सुमारे एक कोटी चौतीस लाख रुपयांपासून एक कोटी सदतीस लाख रुपयांपर्यंत आहेत. बिल्डिंग क्रमांक दोन आणि तीन मधील या सदनिकांचा समावेश उच्च उत्पन्न गटात करण्यात आला आहे. या बदलांमुळे उच्च उत्पन्न गटातील घरखरेदीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

    मुंबई मंडळाने मार्च २०२६मध्ये मुंबईतील विविध भागांतील २,६४० घरांची सोडत जाहीर केली होती. यात विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई, माझगाव आदी भागांतील घरांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८, तर उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध आहेत.

    सोडतीची वेळ नंतर जाहीर होणार

    सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना २८ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून २९ मेपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे. अर्जाची प्रारूप यादी १० जूनला, तर अंतिम यादी १६ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीची तारीख आणि वेळ नंतर जाहीर केली जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

    म्हाडा मुंबई लॉटरी 2026साठी अर्ज कुठे करावा?

    सर्व म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजेच https://housing.mhada.gov.in या लिंकवर जाऊनच करावा.

    म्हाडा मुंबई लॉटरीचे उत्पन्न गट (Income Groups) आणि मर्यादा काय आहेत?

    म्हाडाने वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार खालील गट केले आहेत:

    • EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): वार्षिक उत्पन्न 6लाख रुपयांपर्यंत.
    • LIG (अल्प उत्पन्न गट): वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत.
    • MIG (मध्यम उत्पन्न गट): वार्षिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत
    • HIG (उच्च उत्पन्न गट): वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त.

    म्हाडा मुंबई लॉटरीला कमी प्रतिसाद?

    प्रतिसाद कमी असल्याने म्हाडाने विक्रोळीतील प्रकल्पाच्या किमतीत 7.5 टक्के कपात केली आहे. तसेच, 1,221 पैकी 610 सदनिका आता केवळ ‘उच्च उत्पन्न गटासाठी’ (HIG) राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सदनिका धारकांना मोफत पार्किंग सुविधाही दिली जाणार आहे.

    Maharashtra TimesMumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?

    लॉटरीचे पुढील टप्पे काय आहेत?

    प्रोव्हिजनल यादी 10 जून 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
    हरकती/सूचना नोंदवण्यासाठी 10 जून ते 12जून 2026 पर्यंतचा कालावधी
    अंतिम यादी 16 जून 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
    त्यानंतर सोडतीची तारीख म्हाडाच्या वेबसाईटवर नंतर जाहीर केली जाईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा