• Sun. Jun 14th, 2026
    मुसळधार पावसाने साताऱ्याला झोडपले; मुख्य रस्ते जलमय, येत्या काही दिवसांत कुठे-कुठे पाऊस पडणार?

    Weather Alert: राज्यात उष्णेतची लाट अजून तीव्र झाली असताना बुधवारी साताऱ्याला पावासने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. येत्या काही दिवसांत उष्णेतची लाट येत असतानाच पावासाचीही शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. प्रतिनिधी, सातारा/पुणे: सातारा शहर परिसरात बुधवारी सायंकाळी चारनंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्री साडेआठनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला; तसेच विजेचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात सुरू होता.

    मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट

    बुधवारी सकाळपासूनच प्रचंड उष्णता आणि तापमानाचा पारा वाढत गेल्यामुळे सातारकरांना घरात बसणेही असह्य झाले होते. त्यातच विजेचा लपंडाव सुरू होता. दुपारी साडेतीननंतर अचानक आकाशात काळोख दाटून येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह पडणाऱ्या या पावसाने संपूर्ण वातावरण अंधारून गेले. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले. वादळी वारे आणि जोरदार विजांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे चित्र होते. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोट वाहून अक्षरश: तळी निर्माण झाली होती. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेच्या स्टेज; तसेच प्रेक्षक गॅलरी उभारणीत या पावसामुळे मोठा व्यत्यय आला.Maharashtra TimesMonsoon Prediction: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख!Maharashtra TimesMonsoon Prediction: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख!

    शहरानजीकच्या परळी भागातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, कैऱ्यांचा सडा झाडांखाली पडल्याचे दिसून येत होते. काढणीला आलेला उन्हाळी भुईमूग व इतर पिकांनाही याचा मोठा फटका बसला.

    पुण्यात किमाम तापमानाचा उच्चांक

    शहरात एकीकडे कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे रेंगाळलेला असताना, आता किमान तापमानातही दोन दिवसांत वाढ झाली आहे. दिवसा रस्त्यावर उन्हाचे चटके आणि रात्री गरम हवेमुळे वाढलेल्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. एरवी मध्यरात्रीनंतर हवेत जाणवणारा गारवाही सध्या नसल्याने उकाडा असह्य होतो आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी, शहरातील कमाल तापमानात थोडी घट झाली होऊन ३९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानात वाढ होऊन २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या हंगामातील हे उच्चांकी किमान तापमान ठरले आहे.

    उत्तरेकडील राज्यांकडून येणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात सरासरीपेक्षा जास्त जाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती आहे. आकाश निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे, हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. परिणामी एकीकडे पुणेकरांना मान्सून पूर्व पावसाचे वेध लागले असताना नागरिक सध्या दिवसरात्र उकाडा-उन्हाचे चटके अनुभवत आहेत. शहराबरोबरच, उपनगर आणि जिल्ह्यांमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. गावांमध्ये दुपारी लोक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. पुण्यात उष्माघाताच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे आणि आकाश निरभ्र असेल. सध्या तरी शहरात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway’s Missing Link: मिसिंग लिंकमुळे ‘शिवनेरी’ वेळेवर; प्रवासात 40 मिनिटे वेळ वाचतो, मुंबई-पुणेकरांना मोठा फायदा

    गुरूवारीही पावसाची शक्यता?

    दरम्यान, नागपुरात उष्णेतचा चटका कायम असला तरी रात्री पावसाने हजरे लावली. विदर्भात येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून नागपुरात हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावासाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात उष्णता कायम राहणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा