• Sat. Jun 6th, 2026

    Onion Price : कृषीप्रधान देशाचा कणा अक्षरश: ढसाढसा रडला! कांद्याला कवडीमोल भाव, 100 पोती विकून शेतकऱ्याच्या हाती फक्त 1500; दोन एकर कांदा पेटवला

    Onion Price : कृषीप्रधान देशाचा कणा अक्षरश: ढसाढसा रडला! कांद्याला कवडीमोल भाव, 100 पोती विकून शेतकऱ्याच्या हाती फक्त 1500; दोन एकर कांदा पेटवला

    Solapur Begumpur Farmer Set the Onion Fire : सोलापुरातील बेगमपूरमधील एका तरुण शेतकऱ्याने आपला शेतातील दोन एकरातील कांदा अक्षरश: जाळला आहे. मालाला कवडीमोल भाव मिळाल्यानं संतापात शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं आहे.

    सोलापूर बेगमपूर शेतकऱ्याने कांदा जाळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : कांदा उत्पादक शेतकरी भयंकर अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोलापुरात कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संतप्त झालेल्या बेगमपूर येथील प्रगतशील शेतकरी लखन माने यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रातील कांदा पेटवून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याच्या या कठोर निर्णयाच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली आहे.

    मोठी आर्थिक गुंतवणुक करत कांदा लागवड केला

    मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकरी लखन माने यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. बियाणे, रासायनिक खते, औषधे, मजुरी तसेच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळे लखन माने यांनी शेतातच दोन एकर कांद्याला पेटवून दिलं.
    Maharashtra TimesPune News : धावत्या रेल्वेत उमटला नवजीवाचा पहिला आवाज, मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच बाळाचा जन्म; RPFच्या जवानांचं कौतुक

    शंभर पोती कांदा विकून हाती 1500 रुपये

    लखन माने यांनी कांद्याला पेटवून दिल्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या १०० पोत्यांच्या कांद्याला अवघे १ हजार ४०० रुपये मिळाल्याने लखन माने हतबल झाले. अखेर संतापाच्या भरात त्यांनी शेतातील उभ्या कांद्याला आग लावत निषेध व्यक्त केला.

    राज्यात उन्हामुळे काहिली!

    ‘मान्सून’च्या आगमनाचे अंदाज एकीकडे व्यक्त केले जात असताना, उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, मे महिन्याच्या पूर्वार्धातच शहरातील कमाल तापमान ४१ अंशांच्या पार गेले आहे. रविवारी शहरात ४१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, २०१६नंतरचे मे महिन्यातील शहराचे हे उच्चांकी कमाल तापमान ठरले.
    Maharashtra TimesTiger Attack: गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या दिवशी घटना, परिसरात घबराट

    पुण्यातील हवामान कसं असेल?

    शहरात दिवसभर उन्हाच्या झळांसह जाणवणारा उकाडा रात्रीही कायम राहिल्याने पुणेकर रविवारी सुट्टीच्या दिवशी हैराण झाले होते. शहरात रविवारी कमाल तापमानाने चाळीसचा टप्पा ओलांडला होता. शिवाजीनगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरी ३.४ अंश सेल्सिअसने सामान्यापेक्षा अधिक ठरले. सन २०१६ नंतरही यंदाची ही उच्चांकी नोंद झाली आहे. शहरात या आठवड्यात कमाल तापमानात ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा