Nashik TCS Nida Khan Arrest : नाशिक आयटी कंपनीतील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयतित आरोपी निदा खान हिला अखेर शोधून काढलं आहे. निदान खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसली होती. पण तिला शोधण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी एखाद्या गुप्त मोहिमेप्रमाणे सापळा रचला होता. नारेगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या निदाला पकडण्यासाठी पोलिसांनी आपली ओळख लपवून, साध्या वेशात आणि खासगी गाड्यांनी एन्ट्री केली. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता पोलिसांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे निदा खानला सावरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान ही अत्यंत सावध होती. पोलिसांची हालचाल लक्षात येताच ती जागा बदलत असल्याचे तपासात समोर आले होते. नारेगावसारख्या दाट वस्तीच्या भागात सरकारी गाड्यांचा ताफा किंवा गणवेशातील पोलीस दिसले असते, तर स्थानिक पातळीवर गर्दी जमा होण्याची किंवा माहिती फुटण्याची भीती होती. हीच जोखीम ओळखून नाशिक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिव्हिल ड्रेसमध्ये राहून ही मोहीम फत्ते करण्याचे ठरवले. SSC Result 2026 Live Updates
फ्लॅटवर छापा आणि रात्रीचा थरार
गेल्या तीन दिवसांपासून निदा खान नारेगावमधील कौसर पार्क भागात आपल्या नातेवाईकांकडे लपली होती. ती तिथेच असल्याची पक्की माहिती मिळताच, गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी त्या इमारतीला घेराव घातला. रहिवाशांना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत शांततेत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. निदा खान आपल्या कुटुंबासह तिथेच आढळून आली. जामिनासाठी हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असलेल्या निदाच्या मुसक्या पोलिसांनी जागीच आवळल्या.
न्यायाधीशांच्या घरी रिमांड आणि गाडी बदलली
अटकेनंतर निदाला पोलीस ठाण्यात नेल्यास वातावरण बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी तिला थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर केले. तिथून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतल्यानंतर तिला रातोरात नाशिकला नेण्यात आले. प्रवासादरम्यान देखील पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. अर्ध्या वाटेत 15 सेकंदात आरोपीला एका गाडीतून दुसऱ्या गाडीत हलवण्यात आले, जेणेकरून कोणालाही पोलिसांचा पाठलाग करता येणार नाही. या संपूर्ण अटकेच्या मागे तांत्रिक तपासाचा मोठा वाटा आहे. दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून निदा संभाजीनगरात असल्याची खात्री पटली होती. ती कोणत्या वकिलांच्या संपर्कात होती आणि तिला कोणी आश्रय दिला, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
आतापर्यंत सात जणांना अटक
संशयित निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी निदा हिला अटक करण्यासाठी आपली तपासाची चक्रे आणखी तीव्र केली होती. या प्रकरणात टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या 5 पुरुष आणि एका महिला कर्मचाऱ्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 7 झाली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि महिला कर्मचाऱ्यांचा छळ करणे, असे गंभीर आरोप या सर्वांवर आहेत.
निदा खान ही या प्रकरणातील महत्त्वाची दुवा असल्याचे बोलले जात आहे. तिच्या चौकशीतून हे धर्मांतरणाचे रॅकेट नेमके कोठपर्यंत पसरले आहे? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस आता तिला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा