Nagpur News: या सरकारला जनावरांवर प्रेम आहे, पण माणसांवर नाही. विद्यार्थ्यांवर निर्जीव वस्तूंप्रमाणे लाठ्या चालवण्यात आल्या, अशा शब्दांत तरुणाच्या आईने संताप व्यक्त केला.
मारा सर मारा…लाठ्या बरसल्यानंतरही पोलिसांना नडणारा तरुण महाराष्ट्रातील निघाला; आईला संताप अनावर, अश्रूंचाही बांध फुटला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जखमी अवस्थेत दिसणारा तरुण हा नागपूरचा भारत कमलाकर बानाईत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर भारतच्या आई-वडिलांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला.
भारत बानाईत हा तरुण नागपूरमध्ये झालेल्या सीजेपीच्या आंदोलनांमध्येही तो सहभागी झाला होता. गेल्या महिनाभरापासून तो दिल्लीतील उपोषण आंदोलनात सहभागी होता. लाठीचार्जनंतर त्याचा जखमी अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूरमधील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली.
भारतची आई वनिता बानाईत यांनी सांगितलं की, गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कोणताही मंत्री किंवा जबाबदार अधिकारी पुढे आला नाही. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, हीच होती. मात्र सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. लाठीचार्जची माहिती माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे मिळाल्यानंतर आम्ही रात्री भारतशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने डोक्याला, पायाला आणि पाठीला गंभीर मार लागल्याचे सांगितले. जखमी असल्यामुळे सध्या घरी परत येणे शक्य नसल्याचेही त्याने कळविल्याचे वनिता बानाईत यांनी सांगितले. आक्रमक होत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र टीका केली. ज्या पद्धतीने एखादी इमारत क्रेनने पाडली जाते, त्याच पद्धतीने आमच्या मुलांना मारहाण करण्यात आली. बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले.
भारतचे वडील कमलाकर बानाईत यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू झाल्यापासून भारत त्यामध्ये सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, भारतने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुढेही सक्रिय राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची चर्चा सुरू असून विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईबाबत विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा