Pune Crime: आर्यनने दिलेल्या माहितीच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी आळे खिंड येथील जंगलातून हर्षदाचा मृतदेह शोधून काढला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
हर्षदा (वय साडेतीन वर्षे) असे मृत मुलीचे नाव असून, मुलगा आर्यन (वय ५) हा बचावला आहे. पोलिसांनी सांगितले, की सागरची पत्नी त्याला आणि मुलांना सोडून सात महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली. मुलांचा सांभाळ करणे सागरला जमत नसल्याने तो त्रासला होता. मुलांना फिरायला नेतो, असे घरी सांगून सागर दोन्ही मुलांना घेऊन नाशिकला गेला. तेथून परतताना आळे खिंड येथे एसटी बस थांबल्यानंतर सागर मुलांना घेऊन खाली उतरला. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने दोन्ही मुलांना जवळच्या जंगलात नेले. तेथे आधी आर्यनचा गळा दाबला. निपचित पडल्यानंतर तो मरण पावला असे समजून सागरने त्याला तिथेच सोडले. नंतर मुलीला काही अंतरावर नेऊन तिला गळा दाबून मारले आणि मृतदेह घायपाताच्या झुडपात फेकून देऊन तो मोशीला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचे कपडे बॅगेत भरून तो बाहेर निघाला. ‘चाकणला बालाजीनगरमध्ये खोली घेतली असून, तिथेच मुलांना ठेवले आहे,’ असे वडिलांना सांगून सागर तेथून निघाला.
महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत मुंबई तिसरी! NCRBची 2024ची आकडेवारी, राज्यातील इतरही 2 शहरांचा समावेश
दरम्यान, निपचित पडलेला आर्यन काही वेळाने शुद्धीवर आला आणि जंगलातून चालत आळे परिसरात आला. एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती तेथील पोलिस पाटील गंगाधर चौगुले यांना समजली. त्यांनी आर्यनकडे विचारपूस केली; पण त्याला फार काही सांगता आले नाही. ‘वडील मला आणि बहिणीला घेऊन आले होते. त्यांनी मला रात्री जंगलात सोडले आणि बहिणीला घेऊन ते निघून गेले,’ इतकेच त्याने सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी आर्यनला आळे फाटा पोलिस ठाण्यात आणले.
आपणच दोन्ही मुलांचा गळा आवळल्याची कबुली सागरने चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव, सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि आरोपीला अटक केली.
Pune Nasrapur Case : 2015 मध्ये बायकोच्या खोट्या साक्षीने भीमराव निर्दोष सुटला, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अधिक विकृत; ग्रामस्थांचा आरोप
सागर शिंदेला भोसरीत अटक
आळेफाटा पोलिसांनी आर्यनकडे पुन्हा विचारपूस केली. त्याच्या आजोबांचा मोशीतील पत्ता शोधून त्यांना आळेफाट्याला बोलावून घेतले. त्या वेळी सागरने मुलांबरोबर काही अघटित केल्याची जाणीव त्यांना झाली. दोन्ही मुले हरवल्याची तक्रार भोसरी पोलिसांत देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून सागर शिंदे भोसरीत एका पानटपरीजवळ असल्याचे शोधले आणि त्याला पकडून आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले.
