• Sun. Jun 7th, 2026
    Solapur Accident : पाचही जणांचा जेवणाचा प्लान, हॉटेलहून परतताना काळचा घाला, भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; तिघा मित्रांचा करुण अंत

    Solapur Hyderabad Highway Accident : सोलापुरातील सोलापूर-हैदराबाद मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मित्रांचा करुण अंत झाला आहे. तिघांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    सोलापूर तीन मित्रांचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर (हैदराबाद रोड) काल बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. तीन जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोलापूर-हैदराबाद मार्गावर हा अपघात झाला आहे.

    नेमका कसा झाला अपघात?

    डी-मार्टपासून सुमारे 500 मीटर अंतरावर मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव इरटीगा कारने एमएच 13 इके 7209 रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला एमएच 13 सीयू 8699 पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात कारमधील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. 1 जण गंभीर जखमी झाला होता. आज गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान तिसऱ्या मित्राचा मृत्यू झाला आहे. शेखर सुरेकर (वय 33, रा. कुमठा नाका, सोलापूर) आणि अमोल धैर्यशील येरटे (वय 40, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. कादर सैदू हांडे (वय 33, रा. कुमठा नाका, सोलापूर) तरुण गंभीर जखमी झाला होता. आज गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान कादर हांडेचा मृत्यू झाला आहे. स्वरुप कोथींबीरे (वय 27, जुनी मिल चाळ, सोलापूर) आणि अमित राजेश जाधव (वय 30, रा. पांडुरंग वस्ती, शास्त्री नगर, सोलापूर) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
    Maharashtra TimesSolapur Crime : भावजयीसह तिच्या दोन लेकरांचा जीव घेतला, सोलापुरात ट्रिपल मर्डर, आरोपी दीर पश्चिम बंगालमध्ये सापडला, वहिनीच्या तगाद्यामुळे खून

    जेवणासाठी पाच मित्र ढाब्यावर गेले होते

    सोलापूर-हैदराबाद महामार्गावर झालेला अपघात इतका भीषण होता की, कार सुमारे दीडशे फूट फरफटत गेली. कारचे संपूर्ण छत कापून बाजूला निघून पडले आहे.कारमधील पाच मित्र पुणे रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते मध्यरात्री परत निघाले होते. डी-मार्टच्या पुढे पर्ल गार्डनच्या समोर हायवेवर ट्रक उभा होता. वळणावर कारचालकाला तो दिसला नाही. त्यामुळे ही कार ट्रकवर पाठीमागून धडकली.

    Maharashtra TimesIndorikar Maharaj: इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लुटला; पण एक चूक आणि सर्व चोर सापडले!

    दोघांचा रात्री मृत्यू तर सकाळी एक मृत्यू

    अपघाताची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. शेखर सुरेकर आणि अमोल येरटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. कादर हांडे, स्वरूप कोथिंबीरे, अमित जाधव असे तिघे जखमी झाले होते. मृतांचे शवशवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते तर जखमी वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान कादर हांडेचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा