Pune Crime News : हळूहळू पती गोविंदच्या एका काळ्या सत्याचा उलगडा सोनालीसमोर झाला. गोविंदचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध सुरू होते.
नवविवाहितेची आत्महत्या पुणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : हातावरची लग्नाची हळद आणि मेहंदीचा रंग फिका पडायच्या आतच एका तरुणीने स्वतःचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड परिसरात समोर आली आहे. संसाराची नवी स्वप्ने उराशी बाळगून सासरी आलेल्या अवघ्या 25 वर्षांच्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. पतीचं इतर महिलेशी असलेले संबंध आणि त्यावरून घरात सुरू असलेला रोजचा शारीरिक-मानसिक जाच या टोकाच्या निर्णयामागे कारणीभूत ठरल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
या हृदयद्रावक प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी मृत तरुणीच्या पतीवर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. सुतारदरा भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सोनाली गोविंद पवारअसं मृत विवाहितेचं नाव असून, तिचा पती गोविंद पवार याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime : मैत्रिणीशी बोलल्याचा राग, पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला मध्यरात्री स्कॉर्पिओतून पळवून नेलं, 53 मिनिटात पोलिसांकडून सुखरुप सुटका
नेमकी घटना काय?
काही महिन्यांपूर्वीच सोनाली आणि गोविंद यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला होता; मात्र अल्पावधीतच गोविंदच्या आयुष्यातील एक धक्कादायक बाब सोनालीच्या लक्षात आली. गोविंदचं आधीपासूनच दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि विवाहानंतरही त्याने ते संबंध तोडले नव्हते. नवऱ्याचे हे बाहेरख्याली वागणं जेव्हा सोनालीला समजलं, तेव्हा दोघांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. घरात रोज वादविवाद, खटके आणि संशयाचं वातावरण तयार झालं आहे.
पत्नीलाचा मारझोड अन् त्रास
आपले कृत्य समोर आल्यानंतर गोविंदने चूक मान्य करण्याऐवजी उलट सोनालीवरच राग काढण्यास सुरुवात केली. तिच्यावर सतत संशय घेणे, शिवीगाळ करणे आणि किरकोळ कारणावरून मारझोड करणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढले होते. परिस्थिती सुधारेल या आशेवर असलेल्या सोनालीला अखेर हा छळ सहन होईनासा झाला. नवऱ्याच्या सततच्या त्रासापुढे तिचं धैर्य खचलं.
अखेर 22 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास, सुतारदरा येथील लेन क्रमांक 29 मधील निवासस्थानी कोणीही हजर नव्हते. त्यावेळी अत्यंत तणावाखाली गेलेल्या सोनालीने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून स्वतःला संपवलं. घरात परतलेल्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं. कोथरूड पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत तरुणीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पतीच्या सततच्या छळाला आणि विवाहबाह्य संबंधांना कंटाळूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं. या आधारावर पोलिसांनी गोविंद पवार याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून, कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा