Pune MPSC Student kidnap : मैत्रिणीशी बोलल्याच्या वादातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : मैत्रिणीशी संवाद साधल्याच्या वादातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात घडली. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अवघ्या ५३ मिनिटांत पाठलाग करून तरुणाची सुखरूप सुटका केली, तर दोघा संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मध्यरात्री तरुणाचे अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण १२:३० वाजण्याच्या सुमारास ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून (क्रमांक MH 12 9696) तरुणाचे बळजबरीने अपहरण झाल्याचा निरोप आला. माहिती मिळताच पुणे पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवून नाकाबंदीचे आदेश दिले.
५३ मिनिटात तरुणाची सुटका
संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी रात्री १:२३ वाजताच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर गाडी अडवून प्रसादला आरोपींच्या तावडीतून सोडवले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक) व किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, माळशिरस, सोलापूर) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
Nitin Gadkari : मला लाज वाटते, मुंबई-गोवा हायवेला इतका उशीर झालाय, उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींची घोषणा
पूर्ववैमनस्यातून मारहाण करुन पळवून नेलं
प्राथमिक तपासानुसार, प्रसाद सूर्यवंशी आणि संशयित आरोपी सागरची एक मैत्रीण दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. प्रसाद संबंधित तरुणीशी सतत संपर्कात असल्याने सागरच्या मनात राग होता. याच पूर्ववैमनस्यातून सागरने साथीदारांसह प्रसादला मारहाण करत त्याच्याच वाहनातून जबरदस्तीने पळवून नेले होते.
सुटकेनंतर पीडित तरुणाची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चार जणांचा सहभाग असून ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.
पुण्यातच अन्य परीक्षार्थीने आयुष्य संपवलं
दुसरीकडे, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने आर्थिक विवंचना आणि परीक्षेत सातत्याने येत असलेल्या अपयशातून गळाफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार सदाशिव पेठेत घडला. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २८, रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. त्याने विविध स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. मात्र, त्याला यश मिळाले नव्हते.
Anurag Upadhyay : कॉर्पोरेटची संधी सोडून लष्करात, कर्नल अनुराग उपाध्याय स्ट्रोकनंतर मदतीच्या प्रतिक्षेत, मज्जासंस्थेवर मोठा आघातजीव देण्यापूर्वी त्याने दोन पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आर्थिक अडचणी, घेतलेले पैसे आणि परतफेडीबाबतची माहिती; तसेच संबंधित व्यक्तींची नावे लिहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही नोट जप्त केली असून, त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज असल्याचे त्यात नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा