• Sat. Jun 6th, 2026
    मनमाड- मालेगाव रस्त्यावर टँकर-ट्रकचा भीषण अपघात; 4 जण जखमी, पत्रा कापून जखमींना बाहेर काढले

    Malegaon- Manmad Road Accident: चांदवड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन टँकरमधील इंधन मोठ्या प्रमाणावर वाया गेल्याचे दिसून आले.

    नाशिक अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: इंदूर-पुणे महामार्गावरील, मालेगाव-मनमाड-येवला मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी (दि. ५) टैंकर व ट्रकची समोरासमोर धडक होऊन चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त वाहनातून अक्षरशः गाडीचे पत्रे काढून जखमींना बाहेर काढण्याची वेळ आली.

    मनमाड-मालेगाव रस्त्यावरील दहेगाव शिवारात टँकर (क्र. एमएच ४१ एजी ८०४३) व युरिया घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नांती अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा मालेगाव-मनमाड-येवला मार्ग चर्चेत आला आहे.

    Maharashtra Timesअती तिथे माती! नाशिक MHADA घोटाळा नायब तहसीलदाराच्या अंगलट, तलाठ्यांनीच फोडले बिंग
    अति घाईमुळे घटना
    इंदूर-पुणे महामार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत अवजड वाहने सर्रास दिवसाही मार्गस्थ होत आहेत. सततच्या वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची व तासनतास एका ठिकाणी थांबण्याची धास्ती असल्याने प्रत्येकाला इथून पटकन कसे बाहेर पडावे, याचे वेध लागलेले असतात. त्यामुळे वाहतूक नियमांकडे डोळेझाक होत आहे.

    Maharashtra TimesNashik TCS धर्मांतर प्रकरणामागे ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’; निदा खानचा मोठा गेम उघड, तपासात काय आढळलं?
    महामार्गावर इंधन टँकर उलटला

    येवला : नगर-मनमाड महामार्गावर तालुक्यातील गोपळवाडी फाट्यावर इंधन वाहतूक करणारा टँकर उलटला. यावेळी होणाऱ्या इंधन गळतीने परिसरात मोठी धावपळ उडाली. दरम्यान, महामार्ग पोलिस व तालुका पोलिसांनी तातडीने या महामार्गावरील वाहतूक बंद केली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याचे सांगितले जाते. मंगळवारी, (दि.५) दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त टँकरमधून मोठ्या प्रमाणावर इंधन गळती सुरू झाल्याने घटनास्थळी मनमाड येथून गळती थांबणाऱ्या पथकास पाचारण करण्यात आले होते, तर तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, महामार्ग पोलिस शिपाई संदीप दराडे, योगेश वायबसे आदी घटनास्थळी थांबून होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा