Pune crime news : पुण्यातील गुन्हेगारी ही मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. आता पुण्याच्या आंबेगाव पठार भागात १८ वर्षीय नयन जाधवची केवळ शिवी दिली या कारणावरून कोयता आणि सिमेंट ब्लॉकने हत्या करण्यात आली. याप्रकरणातील सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत, त्यांना अटक करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याच्या दहशतीने शहर हादरून गेलं आहे. आंबेगाव पठार परिसरात घडलेली ही घटना इतकी थरारक आहे की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. किरकोळ कारणावरून एका १८ वर्षीय तरुणाचा भररस्त्यात अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता निलगिरी चौक परिसरात नयन सचिन जाधव (वय १८) हा तरुण नेहमीप्रमाणे परिसरात उभा होता. काही दिवसांपूर्वी त्याचा काही मुलांशी छोटासा वाद झाला होता. तो वाद तिथेच मिटेल असं वाटत असतानाच त्या वादाने भयंकर रूप घेतलं.
“शिवी का दिलीस?”
त्या रात्री अचानक चार ते पाच मुलांचा गट तिथे आला. सुरुवातीला बघण्यावरून पुन्हा चकमक झाली. “काय बघतोस?”, “शिवी का दिलीस?” अशा क्षुल्लक कारणांवरून वाद पेटला. काही क्षणांतच वातावरण तापलं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आरोपींनी अचानक कोयता आणि सिमेंट ब्लॉक हातात घेतले. नयन काही समजायच्या आतच त्याच्यावर हल्ला सुरू झाला. डोक्यावर जोरदार वार करण्यात आले. तो खाली कोसळला, पण हल्ला थांबला नाही. वारांवर वार होत राहिले आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.लोक ओरडत बाहेर आले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. नयन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. काही क्षणात शांत परिसरात किंकाळ्या आणि गोंधळ सुरू झाला.
Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावली
सापळा कारवाई आणि गुन्ह्याची कबुली
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला आणि काही तासांतच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी सातारा रोडवरील वेळू परिसरात लपल्याची खात्री झाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि धाड टाकून चारही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समोर आले आहे.
रागाने तरुणाचा जीव गेला
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा खून कोणत्याही मोठ्या कारणामुळे नव्हे तर केवळ “चापट मारली” आणि “शिवी दिली” या किरकोळ कारणावरून झाला आहे. क्षणिक रागाने एका तरुणाचा जीव घेतला गेला.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये संताप आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि कोयत्याचा वाढता वापर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा