• Sun. Jun 7th, 2026

    Raigad Beach Tar Balls Pollution: रायगडच्या समुद्रकिनारी डांबराचा खच; मासोळीवर विषबाधेचे सावट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका

    Raigad Beach Tar Balls Pollution: रायगडच्या समुद्रकिनारी डांबराचा खच; मासोळीवर विषबाधेचे सावट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका

    पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ‘टार बॉल्स’ (डांबराचे गोळे) वाहून आले आहेत. तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या या प्रदूषणामुळे सागरी जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच समुद्रकिनाऱ्यावर चिंताजनक चित्र समोर आले आहे. समुद्रातून वाहून आलेले लहान-लहान डांबराचे गोळे ( टार बॉल्स ) मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर साचत असून, यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी दिसणारे हे काळे डाग सागरी प्रदूषणाचे स्पष्ट संकेत देत आहेत. भरतीसोबत येणारे हे डांबराचे गोळे वाळूत पसरत असून, काही ठिकाणी त्यांचे थरही साचलेले दिसून येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत या प्रकारात वाढ झाली असून, किनारपट्टीवर प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून, किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवासी आणि निसर्गप्रेमींमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

    टार बॉल्स कसे तयार होतात?

    तज्ज्ञांच्या मते, टार बॉल्स साधारणपणे समुद्रातील तेलगळती (oil spill), जहाजांमधून सोडलेले इंधन व कचरा, तसेच औद्योगिक सांडपाणी यामुळे तयार होतात. समुद्रातील तेल लाटांमुळे घट्ट होऊन लहान गोळ्यांमध्ये रूपांतरित होते आणि भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे हे गोळे किनाऱ्यावर येऊन साचतात. या प्रदूषणाचा थेट परिणाम सागरी जीवसृष्टीवर होत असून, मासे, खेकडे तसेच इतर समुद्री जीवांना धोका निर्माण होतो. तसेच मच्छिमारांच्या उपजीविकेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांसाठीही हे डांबराचे गोळे त्रासदायक ठरत असून, त्वचेला चिकटणे किंवा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.

    प्रदूषणाबाबत चिंता

    स्थानिक नागरिकांनी या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. समुद्राची ही ‘काळी भेट’ भविष्यात मोठ्या संकटाचे रूप धारण करू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा