• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावली

    Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावली

    Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका बापाने गुणपत्रिकेवरील खाडाखोडीच्या संशयावरून ९ वर्षांच्या मुलीला भयानकपणे संपवलं आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने घर पेटवून दिले. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे: माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर प्रेम करण्याऐवजी, एका नराधम बापाने केवळ संशयापोटी आपल्या ९ वर्षांच्या चिमुकलीची इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हत्या केली. या अघोरी कृत्याने संपूर्ण देऊळगाव राजे परिसर सुन्न झाला असून आरोपी बापाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

    नेमका प्रकार काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी शांताराम चव्हाण याला आपला मुलगा संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर (Marksheet) कोणीतरी खाडाखोड केल्याचा संशय होता. या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात असलेल्या शांतारामने आपली ९ वर्षांची मुलगी अनामिका हिच्यावर लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीने थेट हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात चिमुकल्या अनामिकाचा जागीच मृत्यू झाला.

    पुरावे नष्ट करण्यासाठी घराला लावली आग!

    हत्या केल्यानंतर या नराधमाने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesNagpur News : मला समाजासाठी काम करायचं आहे! दृष्टिहीन आदित्यची 12वीत 84 टक्क्यांसह गगनभरारी, अधिकारी होण्याचा निर्धार

    पोलिस कारवाई आणि तपास

    निलेश आत्माराम फडणीस यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी शांताराम चव्हाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका बापाने इतक्या क्रूरपणे स्वतःच्या लेकीचा जीव घेतल्याने समाजातील ढासळत्या मानसिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    बिबवेवाडीत ९ वर्षीय चिमुरडीला छेडण्याचा प्रयत्न; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

    पुणे : बिबवेवाडी परिसरात ९ वर्षांच्या मुलीवर छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोरख कामठे नावाच्या इसमाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

    घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा