Mumbai-Gondia Express: 12106/12105 गोंदिया-नागपूर-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेसच्या गोंदिया-नागपूर दरम्यान 20 दिवस वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरून रवाना होऊन नागपूरपर्यंतच धावणार आहे.
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गोंदिया स्थानकावरील रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले असून सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी म्हणजेच विदर्भ एक्स्प्रेस २३ मेपर्यंत गोंदियाऐवजी नागपूर स्थानकापर्यंतच धावणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
कसं असेल वेळापत्रक?
विदर्भ एक्स्प्रेस क्रमांक १२१०५/१२१०६ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोंदियापर्यंत धावते. मात्र, गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कामांमुळे विदर्भ एक्स्प्रेस क्रमांक १२१०५ आता नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर अंतिम थांबा घेणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच मुंबईसाठी (सीएसएमटी) सुटेल. गोंदिया स्थानकावर इंटरलॉकिंग, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि नवीन मार्गांची जोडणी यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत.Mumbai-Pune Expressway’s Missing Link: प्रवाशांना ‘कनेक्टिंग लिंक’ची भुरळ! घाटातला रस्ता ओस; मुंबई-पुणे प्रवास सुस्साट
या कामांमुळे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. केवळ विदर्भ एक्स्प्रेसच नव्हे, तर अन्य काही गाड्यांच्या फेऱ्यांवरही याचा परिणाम होणार आहे. या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या काही निवडक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, काही गाड्यांना दुसरे थांबे देण्यात आले आहेत. विदर्भ एक्स्प्रेस काही दिवासांकरिता फक्त गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरच थांबणार असल्याने गोंदिया, तुमसर आणि भंडारा येथील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. असे असले तरी रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणाच्या कामांमुळे हा निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
प्रवाशांची मोठी गैरसोय
विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचा अधिकृत ॲप किंवा वेबसाइट तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्थानकावरील कामे पूर्ण होताच विदर्भ एक्स्प्रेस पुन्हा पूर्ववत गोंदियापर्यंत धावू लागेल, असेही दपूमरे प्रशासनाने सांगितले आहे.
Pune Metro: पुण्यात मेट्रोच्या ‘फेझ 2’मधील कामांना वेग! चार मेट्रो मार्गांची बांधणी; शहरात 30हून अधिक स्थानकं
नागपूर-गोंदिया मार्गावर प्रवाशांसाह व्यावसायिक, शेतकरी आणि मालवाहतुकीचीही वाहतूक सुरू असते. या सर्वांना फटका बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमधील व्यापारी आणि कामगार प्रवासासाठी केवळ रेल्वे कनेकटीव्हीटीवर अवलंबून राहतात. पण भविष्यात या मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी काही दिवस प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. ३ मे ते २३ मेदरम्यान, नागपूरातील अजनीपर्यंतच ही ट्रेन धावणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा