अपघातात चक्काचूर झालेल्या बीएमडब्ल्यू कारचा फक्त सांगाडा राहिला होता. कारमधून प्रवास करत असलेले चौघे तरुण एकतर त्या सांगाड्यात अडकले होते किंवा बाहेर फेकले गेले होते. त्यापैकी तिघे शनय गुज्जर, धैर्य सेठ आणि आदित्य जकसनिया यांचा मृत्यू झाला होता. तर आदित्य ओसवाल हा एकमेव बचावलेला तरुण गंभीर जखमी होता.
हृदयद्रावक बचावकार्य
“चालकाच्या सीटवर असलेला शनय फुटलेल्या खिडकीतून अर्धा आत आणि अर्धा बाहेर अशा अवस्थेत अडकलेला होता” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वर्णन करताना सांगितले.
Sahil Wakode : विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, कुटुंबाचा प्राध्यापकावर जातीय भेदभावाचा आरोप, IIT मुंबईकडून प्रोफेसरची पाठराखणबाजूच्या सीटवर बसलेला आदित्य ओसवाल गंभीर जखमी होता. “त्याचे शरीर धक्क्यामुळे अनियंत्रितपणे थरथरत होते” असे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. “त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या; विशेषतः मानेच्या उजव्या बाजूला मोठा आघात झाला होता. त्याच्या हातांवर जखमा होत्या; नाक आणि जबड्यावर समोरुन आघात झाल्यामुळे चेहऱ्यावर मोठी सूज आली होती, तसेच वरच्या जबड्यातून रक्तस्राव होत होता.”
“त्याला ओळखणेही कठीण झाले होते. केवळ त्याचे हात हलत होते. कारमध्ये उघडलेल्या एअरबॅगमुळे कदाचित त्याचे प्राण वाचले असावेत, कारण धडकेची तीव्रता प्रचंड होती.” असे पोलिसांनी सांगितले.
सनरुफमधून बाहेर फेकला गेला
मागच्या सीटवरील दोन प्रवाशांच्या अवस्थेमुळे बचावकार्य अधिकच कठीण झाले होते. हवेत फिरताना झालेल्या जोरदार हालचालीमुळे त्यातील एक जण सनरुफमधून बाहेर फेकला गेला होता, तर दुसरा कारच्या सांगाड्यात अडकून पडला होता. दोघांच्याही चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन सूज आली होती. घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुरुवातीला हे निश्चित करता आले नाही की धैर्य सेठ आणि आदित्य जकसनिया यांपैकी कोण ‘सनरूफ’मधून बाहेर फेकले गेले आणि कोण आत अडकून पडले होते.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की ती बीएमडब्ल्यू गाडी ओळखणेही कठीण झाले होते. या गाडीतील प्रवाशांना अशा भीषण अपघाताचा सामना करावा लागला, ज्यामुळे गाडी उंचावरील ‘कोस्टल रोड’वरुन खाली बांधकामाधीन असलेल्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन पडली.
Kainoor Mistry : बोरीवलीत कार पुलाच्या कठड्यावर आदळली, इंडिगो एअरलाईन्सच्या केबिन क्रूचा करुण अंत, 8 वर्षांचा चिमुरडा मायेला मुकला
अपघातापूर्वीचे क्षण
DD 01 C 6302 हा नोंदणी क्रमांक असलेली बीएमडब्ल्यू गाडी रविवारी पहाटे ५:०३ वाजताच्या सुमारास कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरुन मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी अपघाताचा घटनाक्रम स्पष्ट केला.
“पहाटे ५:०३ च्या सुमारास, DD 01 C 6302 हा नोंदणी क्रमांक असलेली काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीकडे जात होती. कोस्टल रोडवरील लाला लजपत राय कॉलेज आणि लोटस जेट्टीजवळील उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरुन जात असताना, ही कार कोस्टल रोडच्या पुलाच्या संरक्षक भिंतीवरून खाली बांधकामाधीन कार पार्किंग लॉटमध्ये कोसळली” असे जगताप यांनी सांगितले.
१२० ते १४० किमी स्पीडचा अंदाज
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हे चारही मित्र मूळचे गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहेत. काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूमधून मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीकडे जात होते. चालकाचे नियंत्रण सुटले तेव्हा गाडी ताशी १२० ते १४० किमी इतक्या अतिवेगाने धावत असावी, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.
“कार अतिवेगाने – ताशी १२० ते १४० किमीपेक्षा जास्त वेगाने – चालवली जात होती” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “गाडी कोस्टल रोडवरील ३६८ क्रमांकाच्या विजेच्या खांबाला धडकली आणि उलटली. प्रचंड वेगामुळे ती पुढे एका डेस्टिनेशन इंडिकेटरवर धडकली. जमिनीवर आदळण्यापूर्वी कार हवेत दोनदा फिरली आणि त्यानंतर ती अनेक फूट पुढे घरंगळत व घसरत गेली. ती वरुन साधारणपणे ६० ते ७० फूट खाली पडली.”
गुजरातचे मित्र, मुंबईत वास्तव्य
हे चारही मित्र उच्च शिक्षणासाठी अहमदाबाद शहरातून मुंबईत आले होते. आदित्य जकसानिया आणि धैर्य हे जुहू येथील एका विद्यार्थी वसतिगृहात एकत्र राहत होते, तर शनय गुज्जर आणि आदित्य ओसवाल हे सांताक्रूझमधील ‘पेइंग गेस्ट’ निवासस्थानी राहत होते.
यातील तिघे जण एनएमआयएमएस विद्यापीठात शिकत होते, तर आदित्य ओसवाल हा कुर्ला येथील ॲटलस विद्यापीठात ‘बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (बीबीए) चा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती बीएमडब्ल्यू कार शनय गुज्जरच्या कुटुंबाच्या मालकीची होती.
“या अपघातात चार जण जखमी झाले होते. नायर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यापैकी तिघांना रुग्णालयात आणताच मृत घोषित केले. वाचलेल्या एका तरुणाला सुरुवातीला नायर रुग्णालयात आणण्यात आले होते आणि नंतर त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले; त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिली.
ताडदेव पोलीस ठाण्याने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास करण्यासाठी पाच पथके स्थापन केली आहेत.
Nashik Crime : तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस… डॉ मनिषा जेजूरकर मृत्यूप्रकरणी पतीनंतर डॉ स्वाती चव्हाणलाही अटक, लग्नबाह्य संबंधांचा आरोपनेमका घटनाक्रम निश्चित करण्यासाठी, संबंधित पथके अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करत आहेत, कोस्टल रोड मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि त्या बीएमडब्ल्यू कारच्या यांत्रिक स्थितीचीही तपासणी करत आहेत.
