• Mon. Jun 15th, 2026

    Weather Alert: मे महिन्यासाठी हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात कसं असणार वातावरण? तापमान आणि पावसाबाबत महत्त्वाची माहिती

    Weather Alert: मे महिन्यासाठी हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात कसं असणार वातावरण? तापमान आणि पावसाबाबत महत्त्वाची माहिती

    Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये या महिन्यात कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

    मे महिन्यासाठी हवामान विभागाचा अंदाज जाहीर(फोटो– Agencies)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘आयएमडी’च्या विस्तारित अंदाजानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात (१४ ते २१ मे) हिंदी महासागरावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून, याच काळात अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होऊ शकतो. अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख २२ मे आहे. केरळमधील मान्सूनच्या आगमनाची तारीख १५ मेच्या दरम्यान असून, मान्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.

    देशात यंदा एप्रिलमध्ये तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अनुभवायला मिळाला असला, तरी मे महिन्यात मात्र, कमाल तापमान काहीसे दिलासादायक राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

    ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मे महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. एप्रिलअखेरीस महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात सुरू झालेले उष्णतेच्या लाटांचे सत्र चालू आठवड्यात कमी होणार असल्याची शक्यता डॉ. महापात्रा यांनी वर्तवली. ते म्हणाले, ‘मे महिन्यात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे; तसेच दक्षिण भारतातील वादळी पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानाचे दिवस जास्त राहण्याची शक्यता असल्याने देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान जास्त राहिल्याने उकाड्यात मात्र, वाढ होऊ शकते.’

    ‘आयएमडी’च्या मासिक हवामान अंदाजानुसार, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात इतरत्र कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबारपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंतच्या मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहू शकतात.

    केरळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

    केरळच्या काही भागांत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्याच्या एर्नाकुलम, त्रिशूर, इडुक्की आणि मलप्पुरम या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच, हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. ‘ऑरेंज अलर्ट’ हा अतिमुसळधार पावसाचे संकेत देतो. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात अतिनील किरणांची पातळी उच्च असल्याचे नोंदवले गेले. पतनमथिट्टा जिल्ह्यातील कोन्नी आणि इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे अतिनील किरणांची पातळी ‘८’ पेक्षा जास्त असल्याचे नोंदवले गेले; ही पातळी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यासाठी पुरेशी मानली जाते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा