Solapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापुरात एक मोठी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीला संपवण्यात आलं आहे.
सोलापूर बोरामणी आई मुलगा मुलगी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या बोरामणी गावात तिघांना संपवण्यात आलं आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संपत्तीच्या वादातून दिरानेच मृत भावाच्या संसाराचा घात करत घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वहिनी गायत्री सुधाकर मस्के (वय 42), मुलगी प्रिया सुधाकर मस्के (वय 18) आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के (वय 16 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पप्पू म्हस्के असं संशयित आरोपीचं नाव आहे. तालुका पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तिन्ही पार्थिव पोस्टमार्ट्रेमसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शेतीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पतीच्या निधनानंतर दोन लेकरांसोबत राहत होती
गायत्री म्हस्के या पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थित आयुष्य जगत होत्या. पती सुधाकर म्हस्के यांच्या निधनानंतर गायत्री म्हस्के आपल्या दोन लेकरांना घेऊन संघर्षमय जीवन जगत होत्या. मात्र, म्हस्के कुटुंबावर मध्यरात्री मोठं संकट कोसळलं आणि गायत्री म्हस्के आणि त्यांच्या दोन्ही लेकरांना संपत्तीच्या वादातून संपवण्यात आलं आहे. Bodni Ghat Accident : धोकादायक वळणावर भीषण अपघात, सिमेंटच्या ट्रेलरखाली पिकअप चिरडली; आंबा तोडणी मजुरांच्या आक्रोशाने बोडणी घाट हादरला!
चुलता आला आणि तिघांवर जीवघेणा हल्ला
संशयित आरोपी पप्पू म्हस्के हा मध्यरात्री स्वतःच्या घरातून हातात धारदार शस्त्र घेऊन टेरेसवर गेला. संबंधित कुटुंबातील घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग सामायिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते. याचवेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली आणि हातातील धारदार शस्त्राने संशयिताने प्रथम वहिणी गायत्री मस्के यांच्यावर हल्ला केल्याचं समोर येत आहे. आईवर होत असलेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज हे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडले. मात्र, क्रूरतेचा कळस गाठत संशयिताने आई आणि मुलीवर हल्ला करत त्यांनाही संपवले. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेला मुलगा शिवराज जीव वाचवण्यासाठी टेरेसवरुन खाली आपल्या घराकडे पळत आला. पण आरोपीने त्याचाही पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावरही जीवघेणा वार करून त्याला संपवलं असल्याची माहिती समोर आली आहे. Rohit Pawar : महाराष्ट्रात दर तासाला महिलांवर अत्याचार, खळबळजनक आकडेवारी दाखवत रोहित पवारांची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी
दोन पार्थिव टेरेसवर, मुलगा खाली मृतावस्थेत
घटनेनंतर टेरेसवर आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या, तर मुलगा घराच्या खालील भागात मृतावस्थेत सापडला. घटनास्थळी रक्ताने माखलेली तलवारही पोलिसांना आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला असून पुरावे संकलन आणि पंचनामा सुरू आहे. आधी पतीचा आधार हरपलेले हे कुटुंब जगण्यासाठी संघर्ष करत होते. आई लेकरांना घेऊन संसाराचा गाडा हाकत होती. पण संपत्तीच्या वादाने एवढे विकृत रूप धारण केलं की, त्याच कुटुंबातील तिघांचं रक्त एकाच रात्री सांडलं. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या लेकरांचीही निर्दयीपणे हत्या करण्यात आल्यानं बोरामणी परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा