• Sat. Jun 6th, 2026

    Sunetra Pawar : ‘एक आई म्हणून…’; सुनेत्रा पवारांनी धायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांना लावला फोन, नराधमाच्या फाशीसाठी सीएमसोबत थेट चर्चा

    Sunetra Pawar : ‘एक आई म्हणून…’; सुनेत्रा पवारांनी धायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांना लावला फोन, नराधमाच्या फाशीसाठी सीएमसोबत थेट चर्चा

    Sunetra Pawar Nasrapur Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धायरी येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आरोपीला मृत्युदंड मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार आहोत, अशी मागणी केल्याची माहिती दिली आहे.

    सुनेत्रा पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : नसरापूरमध्ये जी घटना घडली त्याचे दृश्य अजुनही लोकांच्या मनातून जात नाहीत. एका निष्पाप निरागस चिमुकलीवर केलेला अत्याचार आणि क्रूरपने केलेली हत्या इतकी मोठी घटना आहे की, संपूर्ण राज्य अजूनही सुन्न झाल्यासारखे आहे. या प्रकरणी राज्यभरातील अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. चिमुकलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे. आज सकाळपासूनच रोहित पवर, सुप्रिया सुळे यांनीही नसरापूमध्ये जाऊन आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी धायरी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

    “एक आई म्हणून…”

    त्या घरातलं वातावरण पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असंच वाटतं होतं. आईच्या डोळ्यातून सतत वाहणारे अश्रू, कुटुंबीयांची हतबल अवस्था, हे सगळं पाहून सुनेत्रा पवार याही काही क्षण बोलू शकल्या नाहीत. “एक आई म्हणून त्या आईचं दुःख मी समजू शकते, पण ते शब्दांत सांगणं खूप कठीण आहे,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी कुटुंबीयांशी शांतपणे संवाद साधत त्यांना धीर दिला आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा

    या घटनेनंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शासन या प्रकरणात कोणतीही कसूर ठेवणार नाही आणि आरोपीला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं.

    Maharashtra TimesSupriya Sule : ‘नराधमाला तात्काळ फाशी देऊन उदाहरण सेट करा’; नसरापूर घटनेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, मंगळवारी ग्रामस्थांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार

    कठोर कारवाई करण्याचा इशारा

    सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास वेगाने सुरू आहे. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून खटला पुढे नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकीलही नेमला जाणार आहे. आरोपीचा आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याने लोकांचा संताप आणखी वाढला आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना कोणतीही सूट मिळता कामा नये. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे असा ठाम इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला.

    ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच आता सगळ्यांची अपेक्षा आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा