Pune Metro News: गणेशमंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (प्रशासकीय व जनसंपर्क) सुजित कानडे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मेट्रोच्या ‘पुणे कार्ड’ची मुदत संपल्यानंतर त्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम वापरता येत नसल्याने प्रवाशांना पुन्हा तिकीट काढावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने ही अडचण तातडीने दूर करून मुदत संपण्यापूर्वीच प्रवाशांना नवीन कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली. त्यावर मेट्रो प्रशासनाने पुढील आठवड्यापासून मुदत संपलेली कार्डे जवळच्या मेट्रोस्थानकावर जमा करून त्या बदल्यात नवीन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून ( महामेट्रो ) नागरिकांसाठी ‘केवायसी’ कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी काढलेल्या कार्डची मुदत आता संपली आहे, तर काहींची मुदत संपत आली आहे. मुदत संपलेल्या कार्डमध्ये रक्कम शिल्लक असतानाही ती कार्डे वापरता येत नाहीत; तसेच नवीन कार्डदेखील मिळत नसल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.
Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी भरुन ठेवा! गुरुवारी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्टबँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डप्रमाणे मेट्रो कार्डची मुदत संपण्यापूर्वीच नवीन कार्ड देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी केली. या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रशांत वेलणकर, सचिव सतीश खैरे, उदय लेले आणि आशिष वेलणकर यांचा समावेश होता.
Pune Crime : संबंधाच्या हेतूने तिने माझ्या मुलाला किस केलं, पुण्यातील वडिलांची पोलिसात धाव, 21 वर्षीय तरुणीवर गुन्हामुदत संपलेली कार्डे असलेल्या प्रवाशांनी पुढील आठवड्यापासून जवळच्या मेट्रोस्थानकावर जाऊन जुने कार्ड जमा करावे आणि नवीन कार्ड घ्यावे. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जुन्या कार्डवरील शिल्लक संपूर्ण रक्कम नवीन कार्डमध्ये क्रेडिट केली जाईल.- सुजित कानडे, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (प्रशासकीय व जनसंपर्क), महामेट्रो
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा