• Sun. Jun 14th, 2026

    Bodni Ghat Accident : धोकादायक वळणावर भीषण अपघात, सिमेंटच्या ट्रेलरखाली पिकअप चिरडली; आंबा तोडणी मजुरांच्या आक्रोशाने बोडणी घाट हादरला!

    Bodni Ghat Accident : धोकादायक वळणावर भीषण अपघात, सिमेंटच्या ट्रेलरखाली पिकअप चिरडली; आंबा तोडणी मजुरांच्या आक्रोशाने बोडणी घाट हादरला!

    Raigad Bodni Ghat Accident : रायगडच्या बोडणी घाटात सिमेंटने भरलेला ट्रेलर पिकअपवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात एका मजुराचा मृत्यू झाला असून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील बोडणी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात घडून एका मजुराचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाले आहेत. घाटातील धोकादायक वळण पुन्हा एकदा जीवघेणे ठरल्याचे या अपघातातून स्पष्ट झाले आहे. सिमेंटने भरलेला अवजड ट्रेलर नियंत्रण सुटून पलटी झाल्याने खाली जात असलेल्या पिकअप वाहनावर कोसळला आणि पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, आंबा तोडणीसाठी काही मजूर पिकअपमधून घाटमार्गे निघाले होते. याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट ट्रेलरचा चालक घाटातील तीव्र वळणावर वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही. ट्रेलर अचानक घसरून पलटी झाला आणि त्याचा संपूर्ण भार पिकअपवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की पिकअपचे मोठे नुकसान झाले आणि त्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

    एक मजूर दगावला

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या धाडसाने मदतकार्य सुरू केले. काही वेळातच रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

    यापूर्वीही अनेक अपघात झाले

    बोडणी घाटातील वळणांवर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे असे अपघात घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घाटात यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    Maharashtra TimesPune Crime : 1998 आणि 2015 मध्येही तो सुटला, पण आता… नसरापूरच्या नराधमाला पोलिसांनी झटपट कसं पकडलं? नराधमाचे दोन जुने कांड उघड

    सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

    स्थानिकांनी प्रशासनाकडे घाटातील धोकादायक वळणांवर वेगमर्यादा फलक, संरक्षक कठडे (गार्डरेल) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. तसेच अवजड वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. ट्रेलर चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

    या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत मजुराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बोडणी घाटातील हा ‘मृत्यूचा सापळा’ पुन्हा एकदा समोर आल्याने प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा