• Tue. Jun 16th, 2026

    Pune Metro: पुण्यात मेट्रोच्या ‘फेझ 2’मधील कामांना वेग! चार मेट्रो मार्गांची बांधणी; शहरात 30हून अधिक स्थानकं

    Pune Metro: पुण्यात मेट्रोच्या ‘फेझ 2’मधील कामांना वेग! चार मेट्रो मार्गांची बांधणी; शहरात 30हून अधिक स्थानकं

    Maha Metro Phase 2: पुण्यात आता अनेक मेट्रो मार्गिकांचं काम सुरू असून इतर काही मेट्रो लाइनची बांधणी सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानकांचं अचूक नियोजन करणं गरजेचं आहे.

    पुणे: पुण्यात येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू असून काही दिवसांत आणखी एक मार्गिका. यासह अतिरिक्त 4 नवीन मेट्रो मार्गिका, जे पुणे शहर आणि शहराबाहेरील भागांना जोडतील, प्रस्तावित आहेत. या 4 मेट्रो मार्गांवर 30हून अधिक स्थानकं असतील. त्यामुळे 30हून अधिक स्थानकांचे ठिकाण आणि आवश्यक जागा कोणत्या निवडता येतील यावरती चर्चा सुरू आहे.

    कोणत्या मार्गांचं काम सुरू?

    पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली. महापालिका प्रशासनाने कोणतेही स्टेशन आणि त्याचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बांधताना वाहनांच्या वाहतुकीसाठी पुरेशी जागा राखून ठेवूनच स्थानक बांधण्यात येईल यवार चर्चा केली. पुण्यात महामेट्रोच्या चार प्रमुख मेट्रो मार्गांवर टप्प्या टप्प्याने काम होणार आहे. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो, वनाज ते चांदणी चौक मेट्रोचे काम आता सुरू झाले आहे. दरम्यान, रामवाडी ते वाघोली मेट्रो आणि खडकवासला ते स्वारगेट ते खराडी मेट्रो मार्गाचं काम येत्या काही महिन्यातचं सुरू होणार आहे.Maharashtra TimesPune-Mumbai Expressway: ‘मिसिंग लिंक’नंतर MSRDCचा गेमचेंजर प्लॅन! ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ दहा पदरी होणार; भूसंपादन प्रक्रिया सुरू

    पुणे मेट्रोच्या फेझ 1 मधील दोन मेट्रो मार्गिांवरील स्थानकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांवर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही ठिकाणे बदलण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पांच्या कामांमध्ये अशा प्रकारचा गोंधळ किंवा बेशिस्तपणा टाळून नियोजन करावे असे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो आधिकाऱ्यांना काम सुरू करताना वाहने आणि पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची सांगितले आहे.

    स्थानकांचं नियोजन कसं करणार?

    मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या स्थानकांवर प्रवासी आणि पादचाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. रहदारीच्या ठिकाणी हे स्थानकं असतील. त्यामुळे प्रशासनाने अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते कामे हाती घेताना पीएमसी आणि पुण्यातील वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत आहेत.

    Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, ‘मिसिंग लिंक’ म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक

    “नजीकच्या काळात अनेक मार्ग रुंद होण्याची अपेक्षा असल्याने आम्ही रस्ते योजना मागविल्या आहेत. पीएमसीने काही भागांवर उड्डाणपूल, अंडरपास किंवा इतर सुविधांचा प्रस्ताव दिला आहे. आमच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीस मदत करण्यासाठी आम्ही प्रशासनाला या कामांचा जास्तीत जास्त तपशील देण्याची मागणी केली आहे,” असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा