• Thu. Jun 18th, 2026
    Mumbai-Pune Missing Link : मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक! मुंबई-पुणे अंतर 30 मिनिटांनी कमी; दररोज 1 कोटींच्या इंधनाची बचत

    Missing Link All Information : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ऐतिहासिक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा प्रकल्प अभियांत्रिकीचा जागतिक नमुना ठरला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला एक नवीन ओळख दिली. “हा केवळ रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा जागतिक नमुना आहे. त्यामुळे याला ‘मिसिंग लिंक’ऐवजी ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधणे अधिक योग्य ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

    ६ किलोमीटरचे अंतर कमी

    या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे टायगर व्हॅलीतील ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज आणि आशियातील सर्वात रुंद बोगदे. सुमारे २३.५ मीटर रुंदीचे हे बोगदे जागतिक स्तरावरील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानले जात आहेत. या नवीन मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे ६ किलोमीटरचे अंतर कमी झाले असून, दररोज सुमारे १ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत प्रगत आहे. यामध्ये ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS), दर ५० मीटरवर आपत्कालीन दूरध्वनी, अग्निशमन यंत्रणा आणि सीसीटीव्हीची चोवीस तास देखरेख असणार आहे. कोविड काळातील संकटावर मात करत हा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले, तर सुनेत्रा पवार यांनी यामुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लोकांसाठी हा मार्ग खुला झाल्यामुळे आता खंडाळा घाटातील ट्रॅफिक आणि वळणांपासून प्रवाशांची कायमची सुटका झाली आहे.

    Maharashtra TimesRaj Thackeray : हाच दिवस तत्सम समूहाचा असता तर गालिचे अंथरले असते; हुतात्मा स्मारकाच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

    “तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प पूर्वी अशक्य असल्याचे सांगत तत्कालीन सरकारने फाईल बंद केली होती. मात्र, २०१५ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ती फाईल पुन्हा उघडली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार कोटी खर्च झाला असला, तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेत किमान ७० हजार कोटींची भर पडेल, अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत कामगारांनी हा प्रकल्प पूर्ण केला असून, तो अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरला आहे. या प्रकल्पाने जागतिक विक्रमही प्रस्थापित केला आहे,” असे फडणवीस म्हणाले.

    कामगार दिनाच्या दिवशीच या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्याचा विशेष आनंद असल्याचेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा