• Tue. Sep 22nd, 2026

Pandharpur News : उतारवयात प्रेम जडलं, वृद्धेने वादातून प्रियकराला संपवलं, दीड महिन्यांनी घटनेचा उलगडा

पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेने 70 वर्षीय प्रियकराची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर तब्बल दीड महिन्यांनी हत्येचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धेला ताब्यात घेतलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या प्रियकरालाच एका क्षुल्लक वादावरुन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वृद्धाच्या हत्येनंतर तब्बल दीड महिन्यांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. मृतक वृद्धाचा डीएनए रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी वृद्ध महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिची कसून चौकशी केली असता महिलेने आपला गुन्हा कबूल केला. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या घटनेतील मृतक वृद्धाचं अंबादास खांडेकर असं नाव होतं. अंबादास हे 70 वर्षांचे होते. तर मंगल होनमाने असं आरोपी वृद्धेचं नाव आहे. अंबादास आणि मंगल यांच्यात गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. पण त्यांच्या या प्रेम प्रकरणाचा शेवट इतका वाईट होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.

मंगलने प्रियकराची हत्या का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास आणि मंगल यांच्यात कुठल्यातरी एका कारणावरुन वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि थेट हिंसाचारापर्यंत जावून पोहचला. हा वाद 27 जुलैला घडला होता. या वादात वृद्ध महिला असलेल्या मंगलने प्रियकर असलेल्या अंबादास यांची शेतात हत्या केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने अंबादास यांच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने अंबादास यांचा मृतदेह जाळून टाकला आणि तिथून पळून गेली.

Maharashtra TimesSatara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा

मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी होतं कठीण

या घटनेनंतर 2 ऑगस्टला काही गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे अशक्यच होतं. त्यामुळे फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं. तसेच मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठववण्यात आले.

अंबादास यांच्या मुलींचे डीएनए नुमने जुळले

या दरम्यान अंबादास खांडेकर हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अंबादास खांडेकर यांच्या दोन मुलींचे डीएन नमुने घेत चाचणीसाठी पाठवले. अखेर या डीएनए चाचणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये अंबादास खांडेकर आणि त्यांच्या मुलींचे डीएनए नमुने जुळल्याची माहिती समोर आली.

Maharashtra TimesNashik Politics : एकनाथ शिंदेंची शिवसेना तालुकाप्रमुखांना देणार 14 बुलेरो गाड्या, पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पोलिसांची 12 तासात महत्त्वाची कामगिरी

घटनेनंतर तब्बल दीड महिन्यांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात केली. दीड महिन्यात केलेल्या तपासाच्या आधारावर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि अवघ्या 12 तासांत मंगल होनमाने या वृद्ध महिलेला ताब्यात घेतलं.

Maharashtra TimesMaharashtra Rain : अचानक वातावरणात बदल होणार, यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

महिलेने गुन्हा केला कबूल

पोलिसांनी मंगल होनमाने हिची कसून चौकशी केली. यावेळी मंगलने आपणच अंबादास यांना संपवल्याचं कबूल केलं. प्रेम प्रकरणात झालेल्या भांडणाच्या रागातून आपण ही हत्या केल्याचं मंगलने कबूल केलं. या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. पण संबंधित प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.