एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला आहे.विद्यार्थी आंदोलनानंतर आता राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत.शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय.छ. संभाजीनगरमध्ये पार पडणाऱ्या या समितीच्या बैठकीला अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.MPSC परीक्षा पद्धतीत पूर्ण पारदर्शकता आणली जावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.या सुधारणा समितीकडून बदल घडावा अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे.मात्र ही समिती म्हणजे केवळ रोष शांत करण्याचा प्रयत्न असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.सामान्य कुटुंबातील तरुणांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत विद्यार्थी भावुक झाले.