Jalgaon Accident: एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर दु:खात झाले असून वागडकर कुटुंबावर मोठा दुःखाचा कोसळलेला आहे.
लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या 22 वर्षीय नववधूसह तिघांचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वऱ्हाड गावाजवळ आज बुधवारी सकाळी 9 वाजता भीषण अपघात घडला आहे. या अपघातात वापी येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीचे चाक चालत्या गाडीतून निखळले आणि गाडी पलटी होऊन नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वाडकर (वय 22) या तरुणीचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच घरी जात असल्याने नववधू प्रचंड आनंदी होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बुधवारी सकाळी गाडी क्रमांक (एम एच 30 AZ 4710) धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निघाले आणि वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला. संसाराचा वेल बहरण्याआधीच नववधूवर काळाने घाला घातला अन् 22 वर्षीय तरुणीचे सुखी संसाराचे स्वप्न भंगले.
अपघातात नववधू पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (वय 42) आणि जगदीश चंद्रभान वाकडकर (वय 52) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात गाडीतील अन्यथा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय 24), नितेश सुरेश काठोडे (वय 35), अमोल दामोदर गीते (वय 35), रवी प्रभाकर वाघोडकर (वय 32), तुळशीराम भीमराव भागवत (वय 67) आणि 14 वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा