Ahilyanagar Chikki Larvae : तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु केलाय. त्याचदरम्यान, आता अहिल्यानगरमध्ये चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पॅकेट उघडताच…
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. मात्र, पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या फिरताना दिसून आल्या. हा प्रकार पाहून ग्राहक हादरला. याबाबत हातगाडी चालकाला विचारणा केली असता, संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचं त्याने सांगितलं.
Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत संपवलं, बॉडी लोखंडी पोत्यात लपवली; आरोपीला मृत्यूदंड, सांगली प्रकरणात ऐतिहासिक निर्णय
बुरशी लागलेले, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थाची खुलेआम विक्री
या घटनेमुळे शहरात विक्रीस असलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुदतबाह्य, बुरशी लागलेले तसेच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खुलेआम विकले जात असल्याची चर्चा असून, संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी आणि प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अशा प्रकारचे निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थ लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवात नव्या गाडीचा श्रीगणेशा, कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?
दूध भेसळीच्या आरोपांनंतर वळसे पाटलांची मोठी घोषणा
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. एफडीएच्या धाडीत एका नामांकित कंपनीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. एफडीएच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला असून आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करत या प्रकरणात माझा काहीही संबंध आढळल्यास मी तात्काळ सामाजिक जीवनातून निवृत्ती घेण्यास तयार आहे, अशी भूमिका मांडली आहे.
