Pune Woman Accident Death : वीस दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाले होते. या धक्क्यातून कुटुंबीय सावरण्याआधीच पुन्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. रस्त्यावर लोंबकळणारी केबल गळ्यात अडकल्याने महिला दुचाकीवरून खाली पडून अपघात झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : निगडी प्राधिकरण परिसरात तुटलेली केबल गळ्याला अडकून दुचाकीवरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. संपदा पटवर्धन (वय ५०) असे या महिलेचे नाव आहे. वीस दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंबीय सावरण्याआधीच पुन्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पटवर्धन यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यावर लोंबकळणारी केबल अडकली
घरातील काही साहित्य आणण्यासाठी संपदा पटवर्धन बाहेर गेल्या होत्या. परतत असताना सेक्टर २६ मधील प्रबोधन सोसायटीतून ज्ञानप्रबोधिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोंबकळणारी केबल गळ्यात अडकल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या. गाडीचा आवाज आल्याने जवळपास असलेल्या मुलांनी त्यांना निगडीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. डोक्याला लागलेल्या मारामुळे त्या दोन दिवस कोमात होत्या. त्यानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी त्यांचे निधन झाले. Mumbai Food Poisoning Case : भावंडांचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग, बिर्याणी-ताकानंतर कलिंगड खाललं, चौघांच्या मृत्यूचं गूढ; कुटुंबीयांच्या मोबाईलमधले मेसेजही तपासणार
वडिलांच्या मृत्यूनंतर आईला घरी बोलावलं
वडिलांच्या मृत्यूनंतर पटवर्धन यांनी आईला आपल्या घरी राहण्यास बोलावले होते. वडिलांच्या धक्क्यातून बाहेर पडण्याआधीच काळाने घातलेल्या या घाल्यामुळे त्यांच्या आईसह कुटुंबावर मोठा आघात झाला. पटवर्धन यांच्या मागे मुलगा स्वानंद (वय २९), मुलगी क्षिप्रा (वय २२) आणि पती असा परिवार आहे.
विविध खासगी कंपन्यांच्या केबल्सच्या वाढलेल्या जाळ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील निगडी-प्राधिकरण, काळेवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, पिंपरी, मोशी, चिंचवड अशा सर्वच भागात या वायर लटकलेल्या पाहायला मिळतात. या कंपन्यांना योग्य नियमावली असायला हवी; जेणेकरून असे अपघात टळतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग, सूत्रसंचालनाची आवड, मंगळागौरीच्या खेळांचा ग्रुप, उत्साही अशी संपदा पटवर्धन यांची ओळख मैत्रिणी सांगतात. निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या त्या कोषाध्यक्ष होत्या. उत्साही असलेल्या पटवर्धन यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे चांगली मैत्रीण गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, या ‘डेथ ट्रॅप’ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार ? – अमित गोरखे, आमदार Food Poisoning Pydhuni Family : कलिंगड, बिर्याणी, दालचिनीसदृश पावडर घातलेलं पाणी आणि खजूर; FDA ने नमुने गोळा केले, चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उकलणार प्राधिकरणात कोणताही रस्ता चालण्यासाठी किंवा वाहन चालवण्यासाठी योग्य राहिलेला नाही. सर्व ठिकाणी रस्ते खोदाई केली आहे. त्यात अशा लटकणाऱ्या केबल नागरिकांचा बळी घेत आहेत. संपूर्ण पटवर्धन कुटुंब या घटनेमुळे उद्ध्वस्त झाले आहे. दोन मुलांचे आईचे छत्र कायमचे हरवले आहे. आमच्या कराच्या पैशातून प्रशासन नक्की कोणता विकास करीत आहे? – वनिता मोहिते, संपदा पटवर्धन यांची मैत्रीण
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा